शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

Water cup competition :  अकोला जिल्ह्यातील १२ गावांना पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2019 18:04 IST

अकोला जिल्ह्यातून चार तालुक्यातील १२ गावांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : पाणी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते वाटर कप स्पर्धा-४ मध्ये चार तालुक्यातील १२ गावांना विविध पुरस्कारांनी ११ आॅगस्ट रोजी सन्मानीत करण्यात आले. तालुक्यातून प्रथम, द्वितीय आणि तृतीय आलेल्या गावांना पाणी फाउंडेशन आणि राज्य शासनाच्या वतीने रोख पुरस्कार देण्यात आले. जिल्ह्याला ८० लाख रुपये मिळाले आहेत. पुणे येथील बालेवाडी येथे पाणी फांउडेशनच्यावतीने पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्यात पाणी फांउडेशनचे अध्यक्ष अमीर खान, मुख्यमंत्र्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पोपटराव पवार यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.अभिनेता अमीर खान यांच्या पाणी फ ाउंडेशनच्या वतीने जिल्ह्यात सत्यमेव जयते वाटर कप स्पर्धा ४ राबवण्यात आली. या स्पर्धेत अंतर्गंत ८ एप्रिल ते मे अखेर पर्यंत श्रमदानातून तसेच यंत्रांच्या मदतीने जलसंधारणाची विविध कामे करण्यात आली आहेत. या कामांचे दोन समित्यांनी मुल्यांकन करून पुरस्कारांची घोषणा केली आहे. तालुक्यातून पहिल्या आलेल्या गावाला पाणी फाउंडेशनच्या वतीने १० लाख रुपयांचा पुरस्कार देण्यात येणार आहे. तसेच तालुक्यातून द्वितीय गावाला सहा लाख रुपये आणि तृतीय आलेल्या गावाला ४ लाख रुपयांचा पुरस्कार शासनाच्या वतीने देण्याची घोषणा यावेळी मुख्यमंत्र्यांचे कार्यकारी अधिकारी यांनी केली. अकोला जिल्ह्यातून चार तालुक्यातील १२ गावांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. यामध्ये तेल्हारा तालुक्यातून अडगाव बु.प्रथम, झरी बाजारला द्वितीय तर चंदनपूर गावाला तृतीय क्रमांक मिळाला. अकोट तालुक्यातून रुधाडी प्रथम, रंगापूर द्वितीय आणि जळगाव नहाटेला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. बार्शीटाकळी तालुक्यातून गोरव्हा प्रथम, सायखेडला द्वितीय आणि लोहगडला तृतीय क्रमांक मिळाला. पातूर तालुक्यात प्रथम पारितोषिक जांभरुनला, द्वितीय राहेर आणि सावरगावला तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे.

या गावांना मिळाले पुरस्कारअकोट- प्रथम-रुधाडी, द्वितीय-रंभापूर, तृतीय जळगाव नहाटेतेल्हारा- प्रथम अडगाव बु, द्वितीय झरी बाजार, तृतीय चंदनपूरबार्शीटाकळी-प्रथम गोरव्हा, द्वितीय सायखेड, तृतीय लोहगडपातूर - प्रथम जांभरुन, द्वितीय राहेर, तृतीय सावरगाव

 

टॅग्स :Water Cup Competitionवॉटर कप स्पर्धाAkolaअकोला