शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

अकोला शहरावर जलसंकट; महान धरणात अवघा नऊ टक्के जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 15:01 IST

अकोला : महान धरणात आजरोजी अवघा नऊ टक्के जलसाठा शिल्लक आहे. पाण्याचा जपून वापर करण्याची वेळ आली असताना पाण्याची होणारी नासाडी चिंतेचा विषय झाला आहे.

ठळक मुद्देशहराला पाणी पुरवठा करणाऱ्या महान धरणातील (काटेपूर्णा प्रकल्प) जलसाठ्यात घसरण झाली आहे.आठ दिवसांतून एकदा पाणी येत असल्याची पुरेपूर जाणीव असतानादेखील नागरिकांना पाण्याचे महत्त्व समजले नसल्याचे चित्र पहावयास मिळते. मनपा प्रशासनाने ‘जल’जागृतीसाठी शहरात फ्लेक्स, होर्डिंग उभारले असले, तरी नागरिकांनीच पाण्याचा जपून वापर करण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

- आशिष गावंडे

अकोला : अकोलेकरांना आठ दिवसाआड पाणी पुरवठा होत असला, तरी पाण्याची किंमत समजत नसल्यामुळे की काय, हातात पाइप घेऊन रस्त्यांवर पाणी शिंपडणारे, चारचाकी, दुचाकी वाहने धुणाऱ्यांची संख्या कमी होण्याचे नावच घेत नसल्याचे चित्र आहे. महान धरणात आजरोजी अवघा नऊ टक्के जलसाठा शिल्लक आहे. पाण्याचा जपून वापर करण्याची वेळ आली असताना पाण्याची होणारी नासाडी चिंतेचा विषय झाला आहे. ही बाब लक्षात घेता मनपा प्रशासनाने जनजागृतीसाठी पुढाकार घेतला असला, तरी शहरातील सामाजिक, स्वयंसेवी संघटनांनी ‘जल’जागृतीसाठी समोर येण्याची गरज निर्माण झाली आहे.गतवर्षी पावसाने हुलावणी दिल्यामुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या महान धरणातील (काटेपूर्णा प्रकल्प) जलसाठ्यात घसरण झाली आहे. पावसाळा संपण्याच्या मार्गावर असताना अखेरच्या काही दिवसांत आलेल्या पावसामुळे धरणाच्या जलसाठ्यात अवघ्या एक ते दीड टक्क्याने वाढ झाली. धरणातील उपलब्ध जलसाठा पाहता महापालिका प्रशासनाने पाणी पुरवठ्याच्या वेळापत्रकात बदल करून शहरवासीयांना आठ दिवसाआड पाणी पुरवठा सुरू केला. नळाला आठ दिवसांतून एकदा पाणी येत असल्याची पुरेपूर जाणीव असतानादेखील नागरिकांना पाण्याचे महत्त्व समजले नसल्याचे चित्र पहावयास मिळते. पाणी पुरवठा करताना त्या-त्या भागातील पाइपलाइनवरील शेवटच्या नळ कनेक्शनधारकांना पाणी पुरवठा करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. पाइपलाइनवरील शेवटच्या नळ कनेक्शनधारकापर्यंत पाणी पोहोचविण्यासाठी लागणाºया कालावधीचा गैरफायदा घेत नागरिक पाण्याची नासाडी करीत असल्याचे चित्र सर्रासपणे दिसून येते. घरासमोरील रस्त्यावर पाणी शिंपडणे, चारचाकी, दुचाकी वाहने धुण्यासाठी पाण्याचा वापर केला जात आहे. धरणातील उपलब्ध जलसाठा पाहता मनपा प्रशासनाने ‘जल’जागृतीसाठी शहरात फ्लेक्स, होर्डिंग उभारले असले, तरी नागरिकांनीच पाण्याचा जपून वापर करण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.धरणातील गाळ काढण्याचा प्रस्ताव!यंदा महान धरणात ठणठणाट होणार असल्याची परिस्थिती आहे. धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्यामुळे जलसाठ्याच्या क्षमतेवर परिणाम झाला आहे. त्यामुळे महापौर विजय अग्रवाल यांनी प्रशासनाच्या मदतीने धरणातील गाळ काढण्याचा प्रस्ताव तयार केला. सदर प्रस्ताव जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्याकडे सादर केल्याची माहिती आहे. 

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola cityअकोला शहरKatepurna Damकाटेपूर्णा धरण