शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
4
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
5
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
6
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
7
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
8
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
9
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
10
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
11
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
12
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
13
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
14
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
15
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
16
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
17
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
18
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
19
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
20
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण

जलसंधारणाच्या कामांना २० गावांमध्ये वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 1:35 PM

तेल्हारा : पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यासाठी वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून सुरू असलेल्या जलसंधारणाच्या कामांना तेल्हारा तालुक्यातील २० गावांमध्ये वेग आला आहे.

- सत्यशील सावरकर   तेल्हारा : पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यासाठी वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून सुरू असलेल्या जलसंधारणाच्या कामांना तेल्हारा तालुक्यातील २० गावांमध्ये वेग आला आहे. या गावातील ग्रामस्थ विविध उपक्रम राबवून श्रमदान करीत आहेत. यावर्षी स्पर्धेची मुदत वाढवून २७ मे करण्यात आली आहे.सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा २०१९ मध्ये या वर्षी तेल्हारा तालुक्यातील ६१ गावांनी आपले गाव पाणीदार करण्याकरिता सहभाग घेतला आहे. अगदी पाहिला प्रशिक्षणाचा टप्पा पार पडत असताना २४ सरपंच, ५ उपसरपंच आणि २९ ग्रामपंचायत सदस्यांनी प्रशिक्षण घेतले आहे. दुष्काळमुक्त तेल्हारा करण्यासाठी ७ तारखेला रात्री १२ वाजता विविध गावात नानाविध प्रकारे श्रमदान सुरू करण्यात आले.यामध्ये सौदळा येथे तृतीयपंथीयांनी श्रमदानाची सुरुवात केली ७ एप्रिलचा रात्री तालुक्यातील एकूण ५ गावांनी रात्री १२ वाजता श्रमदान केले, कुठे एकटे असणारे निवारा येथील श्रीकांत यांनी गाव पाणीदार करण्यासाठी एकापासून श्रमदानाला सुरुवात केली तर मनब्दा येथे केक कापून श्रमदानाची सुरुवात करण्यात आली आणि आनंद साजरा केला गेला. सद्यसथितीत तालुक्यात जवळपास २० गावांमध्ये अखंड श्रमदान सुरू आहे. या सहभागी असलेल्या गावांमध्ये जलसंधारणाचे प्रामुख्याने सलग समतल चर, खोल सलग समतल चर, शेततळे, कंपार्टमेंट बांध, ढाळीचे बांध, शोषखड्डे, विहीर पुनर्भरण हे उपचार घेण्यात आले आहेत. सोबतच माती परीक्षण आणि आगपेटीमुक्त शिवार आणि जलबचत यावरसुद्धा भर देण्यात आला आहे. डोंगराळ भागातील झरी बाजार, मोयपानि, चंदनपूर आणि सपाट भागातील कोठा, मनब्दा, दहिगाव, भंबेरी, आदी गावांमध्ये बांधबंदिस्तीवरचे उपचार घेण्यात आलेले आहेत. ८ एप्रिलपासून या कालावधीत १ व २ मे रोजी महाश्रमदान झाले. त्यामध्ये विविध संघटना, जलमित्रानी श्रमदान केले. यामुळे तालुक्यात पाणी फाउंडेशनचे तुफान दिसत आहे. दरम्यान, बांधावर नावीनपूर्ण उपक्रम करण्यात आले.बांधावर राबवतात विविध उपक्रमश्रमदान करीत असलेल्या बांधावरच विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. बांधावर लग्न लावण्यात आले, श्रमदान करण्यासाठी आलेल्या महिलांना सौदळा आणि मनब्दा येथे साडी-चोळी वाटप, मनब्दा येथील सीमाताईचे दररोज अकोला येथून माहेर मनब्दा येथे श्रमदान करणे व त्यांच्या या कामाला पाहून त्यांच्यासोबत डीएड करणाऱ्या मित्रांनी आपल्या परिवारासह श्रमदान करून मदत करणे, चंदनपूर येथे हंडा कळशी लग्न, मामाचे पत्र, अडगाव येथे जयंती उपक्रम असे एक ना अनेक विविध उपक्रम राबवून सध्या श्रमदान सुरू आहे. ‘माती अडवा, पाणी जिरवा’ उपक्रम करून जलसंधारण कामे होत असल्याने पुढील पावसाचे नियोजन सुरू आहे. यामध्ये पाणी फाउंडेशन चमू, जलमित्रांचे मोठे योगदान आहे.

टॅग्स :AkolaअकोलाWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धाTelharaतेल्हारा