शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

अकोला शहरावर जलसंकटाचे सावट; मनपाकडून १४ कोटींचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 02:26 IST

अकोला :  महान धरणातील उपलब्ध जलसाठा पाहता भविष्यात शहरावर जलसंकट घोंघावण्याची  दाट शक्यता आहे. संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी महापालिकेच्या जलप्रदाय विभागाने १४  कोटी ६0 लक्ष रुपयांचा प्रस्ताव तयार केला आहे. सदर प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांमार्फत विभागीय  आयुक्त कार्यालयात सादर करण्यात आला. विभागीय आयुक्त हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी  शासनाकडे सादर करणार असल्याची माहिती आहे. 

ठळक मुद्देविभागीय आयुक्तांमार्फत प्रस्ताव शासनाकडे

आशिष गावंडे । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला :  महान धरणातील उपलब्ध जलसाठा पाहता भविष्यात शहरावर जलसंकट घोंघावण्याची  दाट शक्यता आहे. संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी महापालिकेच्या जलप्रदाय विभागाने १४  कोटी ६0 लक्ष रुपयांचा प्रस्ताव तयार केला आहे. सदर प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांमार्फत विभागीय  आयुक्त कार्यालयात सादर करण्यात आला. विभागीय आयुक्त हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी  शासनाकडे सादर करणार असल्याची माहिती आहे. यंदा अत्यल्प पावसामुळे महान धरणातील जलसाठय़ात वाढ झाली नसल्याची बिकट परिस्थिती  आहे. आजरोजी महान धरणात १५.३४ टक्के जलसाठा उपलब्ध असून, शहराला आणखी पाच  महिने पाणीपुरवठा होऊ शकत असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जातो. त्यानंतर पाणी पुरवठय़ाच्या समस्येत वाढ होणार असल्याची चिन्हे आहेत. ही बाब गृहीत धरून ऐन वेळेवर धाव पळ नको, या उद्देशातून महापालिकेच्या जलप्रदाय विभागाने पर्यायी जलस्रोतांची चाचपणी करत  शहरातील नादुरुस्त हातपंप, विहिरी, सबर्मसिबल पंपांच्या दुरुस्तीसाठी प्रशासनाने १४ कोटी ६0  लाखांचा आराखडा तयार केला आहे. यामध्ये प्रभागांमध्ये टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करणे, विहिरींच्या  खोलीकरणासह नवीन विहिरींच्या अधिग्रहणाचा समावेश आहे. १६ डिसेंबर रोजी पार पडलेल्या मनपाच्या सर्वसाधारण सभेत महापौर विजय अग्रवाल यांनी संभाव्य  जलटंचाई लक्षात घेता प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर जिल्हाधिकार्‍यांमार्फत हा प्रस्ताव विभागीय  आयुक्त कार्यालयात सादर करण्यात आला. 

३३३ ठिकाणी नवीन पंप, ४५२ ठिकाणी सबपंपसद्यस्थितीत नादुरुस्त २५९ हातपंप तसेच ३२६ सबर्मसिबल पंपांच्या दुरुस्तीचा आराखड्यात  समावेश करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त ३३३ ठिकाणी नव्याने बोअर घेऊन त्यावर हातपंप  लावणे व ४५२ ठिकाणी नवीन बोअरवर सबर्मसिबल पंपांची व्यवस्था केली जाणार आहे. या  कामासाठी ६ कोटींपेक्षा अधिक रकमेची तरतूद प्रस्तावित केली आहे.

महान ते शहरापर्यंत ३६ ठिकाणी बोअरमहान ते अकोला शहरापर्यंत ३६ ठिकाणी बोअर तयार असून, त्यावर अश्‍वशक्तीचे सबर्मसिबल  पंप लावण्यासाठी ७२ लक्ष रुपयांची तरतूद केली आहे. याव्यतिरिक्त ६0 विहिरींचा गाळ काढून  त्यांचे खोलीकरण करणे, ४0 नवीन विहिरींचे अधिग्रहण करणे यासाठी १ कोटी ४४ लक्षची तरतूद  करण्यात आली आहे. 

टॅँकरद्वारे पाणीपुरवठा; ६ कोटींची तरतूद                शहरातील २0 प्रभागांमध्ये प्रति प्रभाग ५ टॅँकर याप्रमाणे पाणीपुरवठा करण्यासाठी जलप्रदाय  विभागाने तब्बल ६ कोटींची तरतूद केली आहे. यापूर्वी महापालिकेत कागदोपत्री टॅँकर दाखवून  कोट्यवधी रुपयांची देयके लाटण्याचा प्रकार घडला होता. हा प्रकार यंदाही घडण्याची शक्यता  नाकारता येत नाही.

जलप्रदाय विभागाने तयार केलेला प्रस्ताव विभागीय आयुक्तांनी मंजूर केला आहे. हा प्रस्ताव  शासनाकडे सादर होताच आढावा बैठकीचे आयोजन केले जाणार आहे. आ. गोवर्धन शर्मा, आ.  रणधीर सावरकर यांच्या मदतीने पाणीपुरवठय़ाचा निधी मंजूर होईल, हे नक्की.- विजय अग्रवाल, महापौर 

टॅग्स :Akola cityअकोला शहरWaterपाणी