शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

६४ गावांमध्ये जलसंकट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 01:29 IST

अकोला : खांबोराजवळील उन्नई बंधारा आटल्याने खारपाणपट्टय़ातील खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा विभागांतर्गत ६४ गावांचा पाणीपुरवठा ७ ऑगस्टपासून बंद करण्यात आला आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांत ६४ खेड्यांमध्ये जलसंकटाची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यानुषंगाने या गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी महान येथील काटेपूर्णा धरणातून पाणी सोडण्याची मागणी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत जिल्हाधिकार्‍यांकडे पत्राद्वारे करण्यात आली आहे.

ठळक मुद्देमहान धरणातून पाणी सोडा ग्रामीण पाणीपुरवठा विभागाची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

संतोष येलकर । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : खांबोराजवळील उन्नई बंधारा आटल्याने खारपाणपट्टय़ातील खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा विभागांतर्गत ६४ गावांचा पाणीपुरवठा ७ ऑगस्टपासून बंद करण्यात आला आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांत ६४ खेड्यांमध्ये जलसंकटाची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यानुषंगाने या गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी महान येथील काटेपूर्णा धरणातून पाणी सोडण्याची मागणी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत जिल्हाधिकार्‍यांकडे पत्राद्वारे करण्यात आली आहे.यावर्षीचा पावसाळा सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटून गेला; मात्र दमदार पाऊस झाला नसल्याने, जिल्हय़ातील धरणांमधील जलसाठय़ात अद्यापही वाढ झाली नाही. त्यामध्ये अकोला शहरासह खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना पाणीपुरवठा करणार्‍या महान येथील काटेपूर्णा धरणात अत्यल्प जलसाठा उपलब्ध असल्याने, या धरणातील जलसाठा अकोला शहर पाणीपुरवठा योजनेसाठी आरक्षित असून, खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसाठी धरणातून पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना खांबोराजवळील उन्नई बंधार्‍यातून पाणीपुरवठा करण्यात येतो. योजनेंतर्गत गावांना आठ दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येत होता; मात्र उन्नई बंधार्‍यातील पाणी संपल्याने खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत गावांचा पाणीपुरवठा ७ ऑगस्टपासून बंद करण्यात आला आहे. त्यामुळे योजनेंतर्गत ६४ गावांमध्ये पावसाळ्याच्या दिवसांत जलसंकटाची परिस्थिती निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे. त्यानुषंगाने ६४ गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी महान येथील काटेपूर्णा धरणातून पाणी सोडण्याची मागणी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत २ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकार्‍यांकडे पत्राद्वारे करण्यात आली आहे.

एक लाख ग्रामस्थांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर!खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांचा पाणीपुरवठा बंद करण्यात आल्याने, या गावांमधील जवळपास एक लाख ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.

पाणी विकत घेऊन भागविली जाते तहान! खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा पाणीपुरवठा बंद झाल्याने पाणी विकत घेऊन तसेच नदी-नाल्यातील ‘झिर्‍या’तील पाण्यावर तहान भागविण्याची वेळ योजनेंतर्गत गावांमधील ग्रामस्थांवर आली आहे.

उन्नई बंधार्‍यातील पाणी संपल्याने खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा पाणीपुरवठा ७ ऑगस्टपासून बंद करण्यात आला आहे. योजनेंतर्गत गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी महान येथील काटेपूर्णा धरणातून पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी जिल्हाधिकार्‍यांकडे पत्राद्वारे करण्यात आली आहे.-अनिल चव्हाण, प्रभारी उपअभियंता, जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभाग.

खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत गावांना गत १२ दिवसांपासून पाणी मिळाले नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे. त्यानुषंगाने ६0 खेड्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी उपाययोजना करण्यात यावी.-दिलीप माहोड, अध्यक्ष, बारुला विभाग, कृती समिती.