शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमध्ये पुन्हा अमानुष कृत्य...! डोंगरात नेऊन तरुणाला रिंगण करीत बेदम मारहाण, २० जणांविरुद्ध गुन्हा, सात जणांना अटक
2
आजचे राशीभविष्य १८ मे २०२५ : कर्क राशीला वाहन सौख्य लाभेल, मकरला नोकरीत बढतीची शक्यता
3
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
4
पाकिस्तानसाठी हेरगिरी, हरयाणाची युट्यूबर ज्योती मल्होत्रासह सहा अटकेत 
5
भुजबळांकडे कोटीची खंडणी मागणारा तोतया जाळ्यात, आयकर अधिकारी सांगून तीन वेळा साधला संपर्क
6
‘एलओसी’ ओलांडून नागपूरची महिला गेली पाकिस्तानात 
7
आजचा दिवस पावसाचा, तुरळक सरींचा 
8
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
9
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
10
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
11
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
12
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
13
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
14
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
15
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
16
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
17
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
18
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
19
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक

२0 जिल्ह्यांवर जलसंकट

By admin | Updated: March 2, 2016 02:38 IST

राज्यात दोन हजार पाणी टँकर, विदर्भात सामाधनकारक स्थिती; तर मराठवाडा व पश्‍चिम महाराष्ट्रात सर्वाधिक टँकर.

नीलेश शहाकार/बुलडाणा पाणीटंचाईचे संकट दिवसेंदिवस गडद होत असून, विदर्भ, कोकण व खान्देश आदी भागाच्या तुलनेत राज्याच्या मराठवाडा व पश्‍चिम महाराष्ट्रात पाणी टँकरची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग तसेच भूजल सर्वेक्षण विभाग यांनी २६ फेब्रुवारी रोजी सादर केलेल्या अहवालानुसार, राज्यात २२९४ खासगी व शासकीय टँकरने णीपुरवठा केला जात असून, यात मराठवाड्यात १६४0 आणि पश्‍चिम भागात ४४५ टँकर आहेत. सद्यस्थितीत राज्यातील २0 जिल्ह्यांवर जलसंकट आहे.गेल्या दोन वर्षांपासून होत असलेल्या अल्प पावसाने राज्यात भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर राज्यात ३ हजार ७८४ गावे व वाड्या वस्त्यांवर राज्यभरात तब्बल २ हजार ९६ टँकरने पाणीपुरवठा होत आहे. सद्यस्थितीत राज्यातील २0 जिल्ह्यांत पाणीटंचाईच्या झळा जाणवत आहेत. या जिल्ह्यातील अनेक गावांना टँकरचा आधार आहे. उर्वरित १४ जिल्ह्यांत फेब्रुवारीअखेर टँकर सुरू झाले नाहीत. पाणीटंचाई असलेले सर्वाधिक जिल्हे मराठवाडा व पश्‍चिम महाराष्ट्रातील आहेत. गेल्या वर्षभर राज्यातील काही जिल्ह्यांत बाराही महिने टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. विशेष म्हणजे गतवर्षी २२ फेब्रुवारी २0१५ च्या अहवालानुसार, यंदा पाणीटंचाई जाणवत असलेल्या या जिल्ह्यांमध्ये पाणी टँकरची आवश्यकता भासली नव्हती.टँकरवरच भागविली जाते तहान!सर्वाधिक टँकर बीड जिल्ह्यात सुरू असून, २९६ गावे व २५२ वाड्या-वस्त्यांना ३९0 खासगी व शासकीय टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. या पाठोपाठ औरंगाबाद ३३८ पाणी टँकर सुरू असून, नांदेड २४३, उस्मानाबाद २४१, अहमदनगर २0९, जालना १७0, लातूरला १६६ पाणी टँकरचा आधार आहे. तसेच सांगली ७८, नाशिक ५५, पुणे ५३, जळगाव १३, धुळे २, सातारा २५, सोलापूर १0, परभणी ८३, हिंगोली ९ या जिल्ह्यांसह विदर्भातील अमरावती जिल्ह्यात १, वाशिम २, बुलडाणा ७, यवतमाळ १, अशा एकूण २0 जिल्ह्यांतील नागरिकांची तहान टँकरच्या पाण्याद्वारे भागविली जात आहे.११ जिल्हे टँकरमुक्त!ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर, सिंधुदुर्ग, नंदूरबार, कोल्हापूर, अकोला, नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली या चौदा जिल्ह्यांत फेब्रुवारीअखेरपर्यंत टँकर सुरू झाले नसल्याची नोंद आहे.