शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

व-हाडातील जलसाठय़ात वेगाने घसरण!

By admin | Updated: March 2, 2016 02:35 IST

अकोल्याच्या काटेपूर्णा धरणात १४.६४ टक्केच जलसाठा

अकोला: फेब्रुवारी अखेरीस पश्‍चिम विदर्भातील शेकडो गावांमध्ये पाणीटंचाईच्या झळा तीव्र झाल्या असून, धरणांमधील जलसाठय़ाची पातळी वेगाने घसरत असल्याने पाणीटंचाईचे संकट अधिक गंभीर झाले आहे. उन्हाचा कडाकाही आताच ३७ अंशाच्या वर पोहोचल्याने पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होत असून, अकोला शहराला पाणीपुरवठा करणार्‍या काटेपूर्णा धरणात केवळ १४.६५ टक्के जलसाठा शिल्लक आहे. अकोला जिल्ह्यातील दगडपारवा व बुलडाणा जिल्ह्यातील कोराडी धरणातील जलसाठा शून्य टक्के आहे.मागील वर्षी पाऊस कमी झाल्याने यावर्षी पश्‍चिम विदर्भातील मध्यम व मोठय़ा धरणांतील जलपातळी घसरली आहे. भूजल पातळीत कमालीची घट झाल्याने बोअरवेल, हातपंप, विहिरींना पाणीच उपलब्ध नसल्याने आतापासूनच महिला-पुरुषांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. जिल्ह्यात पाण्यासाठी नागरिकांचे मोर्चे आंदोलनाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, अकोला शहराला पाणीपुरवठा करणार्‍या काटेपूर्णा धरणात आजमितीस १४.६५ टक्क्यांवर येऊन ठेपला आहे. मोर्णा धरणात १४.६५ टक्के जलसाठा शिल्लक असून, मूर्तिजापूर तालुक्यातील उमा धरणात केवळ ५.८४ टक्के पाणी उपलब्ध आहे. निगरुणा धरणात १७.२९ टक्के जलसाठा आहे, तर दगडपारवा धरण पूर्वीच शून्य टक्क्य़ावर आले आहे. अकोला, बुलडाणा, अमरावती जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या वान धरणात मात्र ५१.७२ टक्के पाणी उपलब्ध आहे. बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा धरणात केवळ १२.३१ टक्के जलसाठा शिल्लक असून, ज्ञानगंगा धरणात ३३.५९ टक्के, मस १४.७२ टक्के, कोराडी शून्य टक्के, पलढग १५.७१ टक्के, तर यवतमाळ जिल्ह्यातील पूस धरणाची टक्केवारी जवळपास १0.६८ असून, लोअर पूस ५२.४४ टक्के, सायखेडा २४.१0 टक्के, गोकी २९.३१ टक्के, वाघाडी ३२.८२ टक्के आणि बोरगाव धरणात १२.७७ टक्के जलसाठा शिल्लक आहे. वाशिम व अमरावती जिल्ह्यातील धरणांची स्थिती याचप्रमाणे आहे.

 काटेपूर्णात अल्प जलसाठा काटेपूर्णा धरणात १४.६५ टक्के जलसाठा शिल्लक आहे. या पाण्याचा वापर जर काटेकोरपणे केला, तर जून-जुलैपर्यंंत हा जलसाठा वापरता येईल; परंतु यापुढे या शिल्लक असलेल्या पाण्याचे काटेकोर नियोजन करावेच लागणार असल्याचे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय लोळे यांनी स्पष्ट केले. कोराडी, दगडपारवा शून्यावर अकोला जिल्ह्यातील दगडपारवा व बुलडाणा जिल्ह्यातील कोराडी धरणाची पातळी शून्य टक्के असून, इतर धरणांतील पातळी वेगाने घसरत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील सर्व प्रकल्प १00 टक्के भरले होते. त्यातील बहुतांश धरणांचा जलसाठा १0 टक्क्य़ांपर्यंत खाली आला आहे.