शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

व-हाडातील जलसाठय़ात वेगाने घसरण!

By admin | Updated: March 15, 2016 02:10 IST

काटेपूर्णा प्रकल्पात केवळ १३.४१ टक्के जलसाठा शिल्लक.

अकोला: पश्‍चिम विदर्भातील शेकडो गावांमध्ये पाणीटंचाईच्या झळा तीव्र झाल्या असून, धरणांमधील जलसाठय़ाची पातळी वेगाने घसरत असल्याने पाणीटंचाईचे संकट गंभीर झाले आहे. तापमानही ४0 अंशाच्या वर गेल्याने पाण्याचे बाष्पीभवन 0.९ मि.मी. वेगाने होत असून, पंधरा दिवसांत ५ ते २0 टक्के जलसाठय़ात घसरण झाली आहे. अकोला शहराला पाणीपुरवठा करणार्‍या काटेपूर्णा धरणात केवळ १३.४१ टक्के जलसाठा शिल्लक आहे. अकोला जिल्हय़ातील दगडपारवा व बुलडाणा जिल्हय़ातील कोराडी धरणातील जलसाठा शून्य टक्के आहे.अकोला शहराला पाणीपुरवठा करणार्‍या काटेपूर्णा धरणात आठ दिवसांपूर्वी १७ टक्के जलसाठा होता. आजमितीस तो १३.४१ टक्क्यांवर येऊन ठेपला आहे. मोर्णा धरणात २0.३७ टक्के जलसाठा होता, तो आज १३.५१ टक्के शिल्लक असून, या धरणाच्या जलसाठय़ात ७ टक्के एवढी घसरण झाली आहे. मूर्तिजापूर तालुक्यातील उमा धरणात ९.९५ टक्के असलेला जलसाठा ३.७६ टक्के आहे. निगरुणा धरणात १७.२९ टक्के जलसाठा होता; आज ११.५७ टक्के आहे. अकोला, बुलडाणा, वान धरणात मात्र ५१.७२ टक्के पाणी होते; आज ते ४७ टक्के आहे. बुलडाणा जिल्हय़ातील नळगंगा धरणात केवळ १४.६७ टक्के जलसाठा होता, तो ११.३0 टक्के आहे. ज्ञानगंगा धरणात ३९.४0 टक्के जलसाठा होता तो ३0.६४ टक्के शिल्लक आहे. मसमध्ये १९.५२ टक्के असलेला जलसाठा आज ११.११ टक्के आहे. पलढग १५.७१ टक्के जलसाठा होता, तो आज ८.२६ टक्के शिल्लक आहे. तर यवतमाळ जिल्हय़ातील पूस धरणाची टक्केवारी जानेवारीअखेरीस जवळपास ३0.९0 टक्के होती ती आजमितीस १0 टक्के आहे. या धरणाची पातळी २0 टक्कय़ाने घसरली आहे. लोअर पूस ६८.७८ टक्के होते, ते ४८.१९ टक्कय़ावर आले आहे. सायखेडा ३६.१५ टक्के होते, ते १९.८६ टक्के आहे. गोकी ४६.५८ टक्के होते, ते २५.२४ टक्कय़ावर आले आहे. वाघाडी ५0.0८ टक्के होते, ते आजमितीस २९.४४ टक्कयावर आले आहे. बोरगाव धरणात जानेवारीअखेरीस ४१.७७ टक्के जलसाठा शिल्लक होता, तो आजमितीस ११.६४ टक्कय़ावर येऊन ठेपला आहे. वाशिम जिल्हय़ातील एकबुर्जी धरणात १.९0 दलघमी तर सोनल धरणात 0.९१ दलघमी साठा शिल्लक आहे.अमरावती जिल्हय़ातील उध्र्ववर्धा, शहानूर, चंद्रभागा, पूर्णा, सपन या धरणांची स्थिती याचप्रमाणे आहे. जलसाठय़ात सर्वत्र घसरण मागीलवर्षी पावसाने पाठ फिरविल्याने वर्‍हाडातील सर्वच जलसाठय़ात अपेक्षित वाढ झाली नाही. परिणामी अकोला जिल्हय़ातील जवळपास धरणात पुरेपूर ५0 टक्केही जलसाठा संचयित झाला नाही, त्यामुळे यावर्षी सिंचनाला पाणी बंद करण्यात आले आहे. तरीही धरणातील पाणी वेगाने घसरत आहे.