शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
3
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
4
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
5
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
6
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
7
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
8
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
9
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
10
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
11
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
12
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
13
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
15
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
16
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
17
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
18
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
19
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
20
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

‘पाणी व स्वच्छता मिशन’ला मिळणार नागरिकांच्या संकल्पनेतील बोधचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2020 11:08 AM

बोधचिन्ह तयार करण्यासाठी राज्यात बोधचिन्ह स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

अकोला : राज्याच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या ‘राज्य पाणी व स्वच्छता मिशन’ च्या अंमलबजावणीकरिता ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता या विषयाच्या अनुषंगाने, बोधचिन्ह तयार करण्यासाठी राज्यात बोधचिन्ह स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत अंतिम विजेत्याला पुरस्कार स्वरूपात ५० हजार रोख देण्यात येणार आहे. या स्पर्धेमुळे राज्याच्या पाणी व स्वच्छता मिशनसाठी नागरिकांच्या संकल्पनेतील बोधचिन्ह तयार होणार आहे, हे विशेष.राज्याच्या ४ सप्टेंबर २०२० च्या मार्गदर्शन सुचनेनुसार, राज्यात पाणी व स्वच्छताविषयक सुविधांची उपलब्धता करण्यासाठी जल जीवन मिशनच्या माध्यमातून अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने राज्य स्तरावर राज्य पाणी व स्वच्छता मिशन स्थापन करण्यात आले आहे. राज्य स्तरावर मिशनकरिता ब्रिदवाक्य असलेल्या बोधचिन्हाची आवश्यकता असून, भविष्यात ग्रामीण पाणी पुरवठा व ग्रामीण स्वच्छताविषयक सुविधांची उपलब्धता करताना या बोधचिन्हाचा उपयोग राज्यभर केल्या जाणार आहे. त्याकरिता बोधचिन्ह स्पर्धेचे आयोजन राज्यभर करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या प्रवेशिका ३० सप्टेंबर २०२० या कालावधीपर्यंत राज्यास पाठविण्यात येणार आहेत. यामध्ये सहभागी होण्यासाठी स्पर्धकांनी राज्याच्यावतीने देण्यात आलेल्या निर्देशाचे पालन करून बोधचिन्ह तयार करून स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.असे असावे बोधचिन्हग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता विषयाचा सहज बोध होईल, असा बोधचिन्ह (लोगो) असावा. या बोधचिन्हाचे (लोगो) ब्रिदवाक्य मराठीमध्ये आणि मोजक्या शब्दातून असावे. बोधचिन्ह (लोगो) एकरंगी, बहूरंगी प्रकारात असला तरी चालेल. सहभागींनी राज्य स्तरावर लोगोची सॉफ्ट कॉपी विभागाच्या directorwsso@gmail.com व iecwsso@gmail.com  या मेल आय डीवर पाठविणे आवश्यक असेल. सोबत संपर्क क्रमांक, पत्ता असणे आवश्यक आहे. अंतिम निवड होणाऱ्या स्पर्धकांनी सीडीआर(उऊफ) फाइल उपलब्ध करून देणे आवश्यक असेल. लोगो अंतिम करण्याचे अधिकार राज्य पाणी व स्वच्छता मिशनला असतील.सहभागी स्पर्धकांनी आपापल्या प्रवेशिका ३0 सप्टेंबर २० ला दुपारी १२ वाजेपर्यंत जिल्ह्यातून राज्य स्तरावर प्राप्त होतील, याची खबरदारी घ्यावी, आदी सूचना स्पर्धेकरिता राज्य स्तरावरून देण्यात आलेल्या आहेत. अकोला जिल्ह्यातील व्यक्ती, संस्था, जाहिरात संस्था यांनी जास्तीत जास्त संख्येने राज्यस्तरीय बोधचिन्ह स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे.- सौरभ कटारिया,मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. अकोला.

 

टॅग्स :Akolaअकोला