शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

४४ लाखांच्या पाेकलेन मशीनसाठी चार काेटींची उधळपट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 10:26 IST

Akola Municipal corporation : ४४ लाख रुपये किंमत असलेल्या मशीनच्या देयकापाेटी मनपा प्रशासनाने तब्बल चार काेटी रुपयांची उधळपट्टी केल्याचा खळबळजनक आराेप शिवसेनेचे गटनेता राजेश मिश्रा, काॅंग्रेसचे पराग कांबळे, इरफान खान यांनी केला.

अकाेला : नायगाव येथील डॅम्पिंग ग्राउंडवर केवळ कचरा हटविण्याच्या तात्पुरत्या कामासाठी पदाधिकाऱ्यांच्या दबावापाेटी पाेकलेन मशीन कार्यान्वित केली हाेती. २०१७ पासून ते आजपर्यंत ४४ लाख रुपये किंमत असलेल्या मशीनच्या देयकापाेटी मनपा प्रशासनाने तब्बल चार काेटी रुपयांची उधळपट्टी केल्याचा खळबळजनक आराेप शिवसेनेचे गटनेता राजेश मिश्रा, काॅंग्रेसचे पराग कांबळे, इरफान खान यांनी केला. सेना, काॅंग्रेसमधील नगरसेवकांच्या आक्षेपाला धुडकावून लावत स्थायी समितीने थकीत देयकासह मुदतवाढीला मंजुरी दिली.नायगाव येथील डम्पिंग ग्राउंडवर साठवणूक केल्या जाणाऱ्या कचऱ्याची तात्पुरती विल्हेवाट लावण्यासाठी २०१७ मध्ये ११ महिन्यांच्या कालावधीसाठी भाडेतत्त्वावर पाेकलेन मशीन सुरू केली हाेती. त्यानंतर या मशीनला मुदतवाढ न देता आजवर सुमारे साडेतीन काेटी रुपयांचे देयक प्रशासनाने अदा केली आहेत. याविषयी मनपा आयुक्त निमा अराेरा यांनाही अंधारात ठेवण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान, मंगळवारी स्थायी समितीसमाेर हा विषय पटलावर आला असता सेनेचे गटनेता राजेश मिश्रा, काॅंग्रेसचे नगरसेवक पराग कांबळे, इरफान खान यांनी प्रशासनाच्या व सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेवर तीव्र आक्षेप घेतला. नगरसेवकांनी पाेकलेन मशीनच्या संदर्भात प्रश्न उपस्थित केले असता प्रशासन समाधानकारक खुलासा करू शकले नाही. मनपात मानधन तत्त्वावर ११५ मानसेवी कर्मचाऱ्यांना मुदतवाढ देण्यात आली. यावेळी सभापती संजय बडोणे, गटनेते राजेश मिश्रा, उपायुक्त पंकज जावळे, नगर सचिव अनिल बिडवे आदी उपस्थित होते.माेकाट श्वानांचे हाेणार निर्बीजीकरणशहरातील मोकाट श्वानांची निर्बीजीकरण शस्त्रक्रिया करणे व श्वानदंश रोगप्रतिबंधक लसीकरण कार्यक्रमासाठी स्वयंसेवी संस्था तसेच प्राणी मित्रांमार्फत प्राप्त प्रस्तावास २५ लाख रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली.अधीक्षक, झोन अधिकाऱ्याची सेवा संपुष्टातमनपात १९९८पासून मानसेवी तत्त्वावर कार्यरत व मालमत्ता विभागात अधीक्षक पदावर सेवारत संदीप गावंडे व पश्चिम झोनचे क्षेत्रिय अधिकारी राजेंद्र टापरे यांची सेवा संपुष्टात करण्याचा प्रस्ताव भाजप नगरसेवक अनिल मुरुमकार यांनी मांडला असता ताे मंजूर करण्यात आला. या प्रस्तावाला सेनेचे सदस्य राजेश मिश्रा, इरफान खान यांनी कडाडून विराेध केला. भाजपच्या या निर्णयामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
टॅग्स :Akola Municipal Corporationअकोला महानगरपालिकाAkolaअकोला