अकोला : जिल्हय़ात कांदा उत्पादन वाढले असूून, शेतकर्यांना कांदा साठवून ठेवण्यासाठी पन्नास कांदा चाळी तयार केल्या आहेत. यासाठी कृषी विभागाने शेतकर्यांना मार्गदर्शन केले; पण पावसाची अनिश्चितता आणि अवकाळी पावसाच्या फटक्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडत आहे. जिल्हय़ात कांदा पिकाचे क्षेत्र वाढत असून, शेतकरी सामूहिक गटाने पुढाकार घेतल्याने या कांद्याच्या क्षेत्रात वाढ होत आहे. शेतकरी सामूहिक गटाने दीडशे हेक्टरवर कांदा लागवड करू न भरघोस कांद्याचे उत्पादन घेत आहेत. जिल्हय़ात कांदा हे भाजीपाला पीक दुर्मीळ होत चालले असताना, आत्मा आणि कृषी विभागाच्या पुढाकाराने पुन्हा कांदा बहरला असून, कांदा उत्पादनासाठी शेतकरी गट तयार झाले आहेत. कांदा बीजोत्पादन पिकापासून चांगले उत्पादन मिळत असल्यानेच जिल्हय़ातील शेतकरी कांदा बीजोत्पादनाकडे वळला आहे. जिल्हय़ात कांदा उत्पादन वाफ्यानुसार घेतले जात आहे; परंतु सलग दीडशे हेक्टर कांदा काही ठिकाणी घेतला जात असून, या पिकांतून चांगला लाभ होत असल्याने शेतकरी गटाच्या सदस्यामध्ये उत्साह आहे.
कांदा उत्पादनाला वाव
By admin | Updated: May 11, 2015 02:22 IST