शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

वाशिम जिल्हाधिका-यांनी रोखले बीडीओ व अभियंत्यांचे वेतन

By admin | Updated: December 9, 2015 02:50 IST

धडक सिंचन कार्यक्रमातील १५00 विहिरी अर्धवट; वारंवार सूचना देऊनही सुधारणा नाही.

संतोष वानखडे / वाशिम:धडक सिंचन कार्यक्रमांतर्गतच्या विहीर बांधकामाकडे दुर्लक्ष करणार्‍या गटविकास अधिकारी व अभियंत्यांचे वेतन रोखण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी २0 नोव्हेंबर काढल्याने आणि डिसेंबरचे वेतन न निघाल्याने, प्रशासकीय पातळीवर एकच खळबळ उडाली. वारंवार आढावा घेऊनही १५0५ अर्धवट विहिरी ह्यजैसे थेह्ण असल्याच्या अहवालावरून सदर आदेश काढल्याचे बोलले जात आहे.शेती परवडत नसल्याची ओरड नेहमीच होत आली आहे. पारंपरिक शेतीला सिंचनाची जोड देऊन भरघोस उत्पादन काढण्याच्या उद्देशातून धडक सिंचन कार्यक्रम राज्य शासनाने अमलात आणला. धडक सिंचन कार्यक्रमांतर्गत वाशिम जिल्ह्यात सन २00९-१0 मध्ये एकूण ७८00 विहिरींचे उद्दिष्ट मिळाले होते. आतापर्यंंत ५२२६ विहिरी पूर्ण केल्या असून, उर्वरित २५७४ विहिरी अपूर्ण असल्याचे आढावा बैठकीतून निदर्शनात आले. अपूर्ण विहिरींपैकी धडक सिंचन कार्यक्रमातून रोजगार हमी योजनेत (नरेगा) वर्ग केलेल्या १२६0 विहिरी व अनुदानात वाढ केलेल्या २४५ विहिरी पूर्ण करावयाच्या आहेत, तसेच १0६९ रद्द करावयाच्या विहिरींपैकी २६५ विहिरी पुनर्जीवित करणे प्रस्तावित आहे. गत चार महिन्यांपूर्वी जिल्ह्यात नरेगामध्ये १२६0 व अनुदानात वाढ झालेल्या २४५ अशा एकूण १५0५ विहिर पूर्ण करण्याचे निर्देश जिल्ह्याधिकारी राहुल द्विवेदी यांनी सर्व यंत्रणांना वारंवार दिले होते; मात्र चार महिन्यानंतरही परिस्थिती ह्यजैसे थेह्ण असल्याचे निदर्शनात आले, तसेच विहिरींची कामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने महिनानिहाय नियोजन सादर करण्याचे सुचवूनही अद्याप सदर नियोजन संबंधितांनी सादर केले नाही. रद्द विहिरींपैकी पुनर्जीवित करावयाच्या विहिरींचे लाभार्थीनिहाय माहिती सादर झाली नाही. विहिरींच्या प्रगतीबाबतचा अहवाल नियमित येत नसल्याने वरिष्ठांकडे माहिती सादर करण्यास अडचणी येतात. या सर्व दिरंगाईला जबाबदार असणार्‍या जिल्ह्यातील सहा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, लघु सिंचन व पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता आदींना कामगिरीत सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या होत्या; मात्र सुधारणा झाली नसल्याने वेतन रोखण्याची कारवाई करण्यात आली.