शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित
2
डेटिंगवरून वाद विकोपाला, मुलीने जीव गमावला; सीसीटीव्ही, साक्षीदारांमुळे तपासाला दिशा
3
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
4
ट्रम्प यांना मोठं यश, अमेरिकन सिनेटमध्ये 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; आता नवीन पक्ष स्थापन करणार इलॉन मस्क?
5
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
6
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
7
बारा गावच्या शेतकऱ्यांनी रोखली, 'शक्तीपीठ महामार्गा'ची मोजणी...!
8
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
9
"एका आठवड्याच्या आत इस्लामाबादवर कब्जा"; पाकिस्तानच्या जमीयत नेत्याची शाहबाज शरीफ यांना धमकी
10
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
11
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
12
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
13
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
14
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
15
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
16
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
17
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
18
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
19
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
20
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद

पंढरपूरच्या वारीत अवतरला वाशिमचा स्वच्छतेचा रोबोट!

By admin | Updated: July 6, 2016 02:47 IST

वाशिम येथील शिक्षकाने रोबोटचा वेश धारण करून लोकांना दिला स्वच्छतेचे संदेश.

वाशिम : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या वारीत वाशिम येथील स्वच्छतेचा रोबोट ( यंत्र मानव) अवतरला असून, वारीतील वारकर्‍यांचे तो लक्ष वेधून घेत आहे. वाशिम येथील शिक्षक गोपाल खाडे यांनी हा रोबोट साकारला असून ते यामार्फत लोकांना स्वच्छतेचे संदेश देत आहेत.राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छता दिंडीत वाशिमसह १६ जिल्हा परिषदेचे कलापथक सहभागी झाले आहेत. स्वच्छ भारत मिशनच्यावतीने वाशिम येथील गोपाल खाडे यांनी स्वत: स्वच्छतेचा रोबोट साकारला असून ते यावर्षी स्वच्छता दिंडीत सहभागी झाले आहेत. ते कारंजा तालुक्यातील कामरगाव येथे शिक्षक असून शासनाच्या वेगवेगळ्या अभियानात ते उत्स्फूर्तपणे सहभागी होत असतात. वाशिम जिल्ह्यात त्यांनी स्वच्छतेच्या अनेक उपक्रमात भाग घेतला होता. त्यांच्या कामाची दखल घेऊन वाशिम जिल्हा परिषदेचे मुख्य कायर्कारी अधिकारी गणेश पाटील आणि उपमुख्य कायर्कारी अधिकारी महेश पाटील यांनी त्यांना राज्याच्या स्वच्छता दिंडीत पाठविले आहे. असा आहे स्वच्छतेचा रोबोटहुबेहूब रोबोटच्या आकाराचा वेश परिधान करुन त्यावर स्वच्छतेचे संदेश रंगविण्यात आले आहेत. रोबोटच्या डोक्यावर 'तुझं गावच नाही का तीर्थ' असे लिहिलेले असून पोटावर 'व्वा वाशिम- स्वच्छ वाशिम' असा बोर्ड लावला आहे. पाठीवर, हाता-पायांवरही पाणी व स्वच्छतेविषयी संदेश छापण्यात आले आहे. असा हा रोबोटचा वेश परिधान करुन खाडे हे यंत्न मानवाच्या आवाजात लोकांशी संवाद साधतात. लोकांशी हस्तांदोलन करतात. रोबोटच्या लकबीत हालचाली करतात. आपल्या विशिष्ट शैलीच्या माध्यमातून रोबोट हा वारीतील लोकांना स्वच्छतेचे संदेश देतो. उघड्यावर शौचास केल्याने महिलांची अब्रू जाते आणि आरोग्याला बाधा पोचते असे तो सांगतो.