शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

मुसळधार पावसाचा इशारा; हरभरा पेरणीची घाई नको!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 10:44 IST

Agriculture News, Akola हरभरा पेरणीची घाई करू नये, असे आवाहन कृषी तज्ज्ञांकडून केले जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: राज्यात ९ ते १६ आॅक्टोबर दरम्यान मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. या पावसाचा शेती पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसणार असून, शेतकऱ्यांनी उभ्या पिकांच्या संरक्षणासाठी आवश्यक उपाय योजना कराव्यात, तसेच हरभरा पेरणीची घाई करू नये, असे आवाहन कृषी तज्ज्ञांकडून केले जात आहे.राज्यभरातील शेतकरी सोयाबीन, मूग काढणीला लागले आहेत. तर काही भागात शेतकरी हरभरा, करडई, मोहरी, जवस पेरणीच्या तयारीत आहेत; मात्र बँकॉक- थायलंड समुद्र किनारपट्टीजवळ चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली आहे. हे वादळ अंदमानच्या निल्लूर किनाºयाकडे प्रवास भारतीय किनारपट्टीवर धडकणार आहे.त्यामुळे तेलंगणासह महाराष्ट्रातही पावसाचे वातावरण तयार झाले असून, राज्यात ९ ते १६ आॅक्टोबर या कालावधीत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आला आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका शेती पिकांना बसणार आहे.त्यामुळे शेतातील सोयाबीन, उडीद, मुगाच्या पिकांसह इतर पिकांचे पावसापासून रक्षण करण्याचे आवाहन कृषी तज्ज्ञांकडून शेतकऱ्यांना केले जात आहे. यासोबतच हरभºयासह करडई, मोहरी, जवस पेरणीच्या तयारीत असलेल्या शेतकºयांनी पेरणीची घाई करू नये, असेही आवाहन केले जात आहे.बियाण्यांची उगवण क्षमता धोक्यात!खरिपातील पीक काढणीसोबतच शेतकरी रब्बी हंगामाच्या पेरणीची तयारी करत आहेत; मात्र रब्बी हंगामात ऐन पेरणीच्या काळात पाऊस झाल्यास पेरलेल्या बियाण्यांच्या उगवण क्षमतेवर परिणाम होण्याचा धोका वर्तविला जात आहे. त्यामुळे शेतकºयांनी हरभरा पेरणीची घाई न करता पाऊस थांबण्याची प्रतीक्षा करावी.राज्यात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पुढील पाच ते सहा दिवस राज्यातील विविध भागात पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. विदर्भात २५ ते ३० मिमी., मराठवाड्यात २० ते ५० मिमी., कोकण विभागात ३० ते ५४ मिमी. तसेच पश्चिम महाराष्ट्रात २० ते ८० मिमी. पावसाचा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्रात मात्र जळगाव वगळता इतर ठिकाणी पावसाची शक्यता नाही.- डॉ. रामचंद्र साबळे, हवामान तज्ज्ञ, पुणे.

राज्यात पावसाचा अंदाज वर्तविण्यात आल्याने शेतकºयानी सोयाबीनसह इतर उभ्या पिकांचे संरक्षण करावे, तसेच हरभºयासह इतर पिकांच्या पेरणीची घाई करू नये.- डॉ. विलास खर्चे, संशोधन संचालक, पीडीकेव्ही, अकोला.

 

 

टॅग्स :AkolaअकोलाAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी