शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

महापोर्टलद्वारे परीक्षा घेतल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 15:04 IST

आजवरची निवड प्रक्रिया रद्द करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीने केली होती

अकोला : भाजप सरकारच्या काळात सुरू करण्यात आलेले महापरीक्षा पोर्टल देशातील सर्वात मोठा आॅनलाइन परीक्षा घोटाळा आहे. आर्थिक गैरव्यवहाराच्या आधारे महापरीक्षा पोर्टलद्वारे भरती प्रक्रियेतील अयोग्य उमेदवारांची निवड झाली आहे. गैरव्यवहाराची जलदगती न्यायालयीन चौकशी करून गुन्हे दाखल करावे, तसेच आजवरची निवड प्रक्रिया रद्द करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीने केली होती. त्यावर महापोर्टलमध्ये असलेल्या त्रुटी दूर करून उपाययोजना करण्याचे ठरले. तोपर्यंत पशुसंवर्धन विभागाची भरती पोर्टलद्वारेच घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. तसे झाल्यास वंचित बहुजन आघाडीच्या वतीने न्यायालयात प्रकरण दाखल केले जाईल, असे प्रदेश प्रवक्ते राजेंद्र पातोडे यांनी म्हटले आहे.राज्यात भरती करण्यासाठी महापरीक्षा पोर्टलची निर्मिती केली आहे. या पोर्टलची जबाबदारी कंत्राटामार्फत यूएसटी इंटरनॅशनल आयटी कंपनीला देण्यात आली; मात्र या पोर्टलद्वारे आॅनलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यास सुरुवात झाल्यानंतर गोंधळ सुरू झाले. पारदर्शकतेच्या नावाखाली आर्थिक गैरव्यवहाराच्या अनेक घटना पुढे आल्या. पात्रतेऐवजी जात, आडनाव, वशिल्यावर अयोग्य उमेदवारांची निवड करण्यात आली. त्या महाभरतीमध्ये भ्रष्टाचार आहे. कोणतीही पारदर्शकता नाही. प्रश्नपत्रिका दिली जात नाही. उत्तर पत्रिकाही नाही. टीक मार्क केलेली पत्रिकाही मिळत नाही. त्यामुळे या कंपनीबाबत अनेक शंका आहेत. सरकारने नेमलेली आयटी कंपनी व व्यापमं घोटाळ्यातील कंपनी एकच आहे का, याची चौकशी करावी तसेच ‘व्यापमं’शी संबंधित कंपनीला काम दिले असल्यास हे काम कोणी दिले, याबाबत न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करावी, अशी मागणी सातत्याने केली गेली. याच कंपनीने मध्य प्रदेशमध्ये घोटाळा केला. महाराष्ट्रात आॅनलाइन भरतीत भ्रष्टाचार होत आहे. तत्काळ पोर्टल भरती बंद करून आॅनलाइन परीक्षा घेण्याची मागणी झाली. त्यावेळी पोर्टलद्वारे भरतीला स्थगिती देण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी पशुसंवर्धन विभागाची परीक्षा पोर्टलमधील त्रुटी दूर करून घ्यावी, त्याद्वारेच आॅनलाइन घ्यावी, असे निर्देश दिले. त्यावर न्यायालयाने याप्रकरणी दखल घेऊन कारवाई करावी, पुन्हा याच पद्धतीने परीक्षा घेतल्यास न्यायालयात जाण्याचा इशाराही पातोडे यांनी दिला आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाexamपरीक्षाVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडी