शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

वारीच्या धरणातून २० वर्षांपासून गाळाचा उपसाच नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 15:03 IST

दरवर्षी शंभर टक्के साठा असलेल्या या धरणातील गाळ गेल्या २० वर्षांपासून काढलाच नसल्याचे चित्र आहे.

- सत्यशील सावरकर लोकमत न्यूज नेटवर्कतेल्हारा : वारी हनुमान सागर धरण हे तालुक्यासह इतरही जिल्ह्यासाठी जलसंजीवनी देणारा प्रकल्प आहे. दरवर्षी शंभर टक्के साठा असलेल्या या धरणातील गाळ गेल्या २० वर्षांपासून काढलाच नसल्याचे चित्र आहे. गाळ न काढल्याने परिसरातील भूजल पातळी वाढली नाही.वारी हनुमान सागर प्रकल्प तालुक्यातील जनतेला सिंचनासाठी मोठा आधार असलेला प्रकल्प आहे. या पाण्यावर सिंचन करून लाभक्षेत्रातील शेतकरी खरिप व रब्बीत चांगले पिके घेतात. या प्रकल्पातील पाण्यावर विद्युत प्रकल्पसुद्धा चालतो, त्यामुळे परिसरातील जनतेच्या नजरा या धरणातील जलसाठ्याकडे असतात. उन्हाळ्यात सर्वत्र भीषण दुष्काळ पडला आहे. अनेक ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे. भूजल पातळी प्रचंड खालावली आहे. बहुतांश बोअरवेल कोरडे पडले आहेत. बागायती शेती कोरडवाहू होत आहे. एकूणच परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे, असे असताना वारी येथील हनुमान सागर प्रकल्प हा दोन जिल्ह्यातील लाखो लोकांची तहान भागवित आहे. सोबतच हजारो हेक्टर जमीन सिंचनाखाली असते, त्यामुळे या धरणातील जलसाठ्याकडे सर्वांचे लक्ष असते; परंतु या ठिकाणी भूजल पातळीत सुरुवातीला वाढ दिसली. त्यानंतर परिसरातील भूजल पातळीत वाढ दिसत नसल्याचे दिसत आहे. जेथे मोठे धरण आहे, त्या परिसरात भूजल पातळी चांगली राहते; परंतु वान प्रकल्प वीस वर्षांपासून कार्यरत असून, या परिसरात भूजल पातळीत वाढ होण्याऐवजी सतत खालावत आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. गत वीस वर्षात धरणातून गाळ काढला नसल्याने पाणी मुरण्याच्या प्रमाणात घट होत असल्याने भूजल पातळीत वाढ होताना दिसत नाही. परिणामी, परिसरात बागायती शेती कमी होत आहे. एकीकडे धरणातील गाळ काढण्यासाठी गाळमुक्त धरण, ही महत्त्वाकांक्षी योजना महाराष्ट्र शासनाची असली तरी हनुमान सागर प्रकल्पातील गाळ काढण्याबाबत प्रयत्न होणे गरजेचे आहे.हनुमान सागर प्रकल्पाचा जलाशय परिसर हा मेळघाट व्याघ्र प्रकल्पात येत असल्याने व गाळ काढण्याकरिता वन विभागाच्या परवानगीची गरज आहे. मागील वर्षी वान प्रकल्प अभियंत्यांनी त्याबाबत मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या उपवन संरक्षकांकडे धरणातील गाळ काढण्याबाबत लेखी पत्राद्वारे परवानगी मागितली होती. विशेष म्हणजे वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या पत्राला कोणतेच उत्तर दिले नसल्याचे समजते आणि अजूनपर्यंत परवानगीही दिली नसल्याचे समजते. याबाबत ठोस निर्णय व्हावा, अशी मागणी होत आहे.

वान प्रकल्पाच्या सभोवताली व्याघ्र प्रकल्पाची वन जमीन असल्यामुळे या कार्यालयामार्फत आम्ही सुजलाम सुफलाम योजने अंतर्गत वन विभागाला गाळ काढण्याबाबत परवानगी मागितली होती, ती अद्याप मिळालेली नाही.अ. प्र. गुल्हाने,सहायक अभियंता श्रेणी-१वान प्रकल्प, तेल्हारा.

भूजल पातळी खालावत असतानाही शासनाची गाळमुक्त धरण योजना कागदावरच आहे. वीस वर्षांपासून प्रलंबित हनुमान सागर प्रकल्पातील गाळ तत्काळ काढण्यात यावा.- संतोष बजाज

टॅग्स :AkolaअकोलाTelharaतेल्हाराWan Projectवान प्रकल्प