शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांमध्ये संशोधनवृत्ती जागवा - सीईओ विधळे

By admin | Updated: August 9, 2016 02:25 IST

इन्स्पायर अवार्ड जिल्हास्तरीय प्रदर्शनाचे उद्घाटन; १६४ शाळांच्या विद्यार्थ्यांचा सहभाग.

अकोला: विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक, संशोधनवृत्ती जागविण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करायला हवेत. विज्ञान विषयामध्ये संशोधन व विकासाच्या दृष्टीने इन्स्पायर अवार्ड प्रदर्शनाचे आयोजन ही विद्यार्थ्यांंसाठी मोठी संधी आहे. अशा प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी मदत होते. विविध प्रकारचे विज्ञान प्रकल्प विद्यार्थी तयार करतात. त्यांच्यासाठी हे उत्तम व्यासपीठ आहे. अशा प्रदर्शनाच्या माध्यमातून संशोधक, चिकित्सक विद्यार्थी समोर येतात. त्यांच्या प्रकल्पांच्या माध्यमातून देशविकासाला हातभार लागू शकतो. असे मत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण विधळे यांनी केले. मेहरबानो विद्यालयाच्या सभागृहात ८ ऑगस्टपासून सुरू झालेल्या इन्स्पायर अवार्ड जिल्हास्तरीय प्रदर्शनाचे उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे होत्या. प्रदर्शनाचे उद्घाटन महापौर उज्ज्वला देशमुख यांनी केले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद, निरंतर शिक्षणाधिकारी वैशाली ठग, मुख्याध्यापिका मीनल भेंडे, एम.डी. चोपडे, उपशिक्षणाधिकारी दनाडे, गटशिक्षणाधिकारी बाळापूर गणगणे, ईश्‍वरकर (मूर्तिजापूर), गटशिक्षणाधिकारी शिंदे (पातूर), शिक्षण उपनिरीक्षक अश्‍विन मानकर, दिनेश दुतंडे, अरुण शेगोकार, विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. रवींद्र भास्कर, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष शत्रुघ्न बिरकड, सचिव बळीराम झामरे यांची उपस्थिती होती. इन्स्पायर अवार्ड प्रदर्शनामध्ये अकोला जिल्हय़ातील १२0 शाळांमध्ये १६0 विद्यार्थी आणि अमरावती जिल्हय़ातील ४४ शाळांमधून ५८ विद्यार्थी सहभागी झाले आहेत. प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांंनी सौरऊर्जा, पर्यावरण, डिजिटल इंडिया, हरितऊर्जा, अन्नसुरक्षा आणि पोषण विषयावर आपले संशोधनात्मक विज्ञान प्रकल्पांचे सादरीकरण केले आहे. प्रदर्शन १0 ऑगस्टपर्यंत जी.एस. कॉन्व्हेंट आणि स्वावलंबी विद्यालयात होत आहे.