शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवार यांना 'दादा'गिरी अंगलट; आधी फोनवरून झापलं, नंतर दिलं स्पष्टीकरण
2
Mumbai: १४ पाकिस्तानी ४०० किलो आरडीएक्ससह देशात घुसले
3
बाप्पाच्या निरोपाला वरुणराजाही, विसर्जन निर्विघ्न पार पाडण्यासाठी पालिका, पोलिसांकडून नियोजन
4
ganesh visarjan 2025: बाप्पाच्या निरोपाचे एआयद्वारे ट्रॅकिंग, ड्रोनने सूचना; २५ हजार पोलिस सज्ज
5
महापालिकेची पूर्वतयारी परीपूर्ण, राज्य निवडणूक आयुक्त आढाव्यानंतर समाधानी
6
Vanraj Andekar: वनराज आंदेकर टोळीने रक्तरंजित बदला घेतला; नाना पेठेत गोळीबार, आयुष कोमकरचा खून
7
भारत माफी मागेल, चर्चेच्या टेबलवर वाटाघाटीला येईल; डोनाल्ड ट्रम्प यांचे सचिव बरळले, धमकीही दिली
8
तंबाखू, सिगारेट अन्..., आणखी महागणार; केवळ ४०% जीएसटीच नव्हे, अतिरिक्त टॅक्सही लागणार?
9
अभिनेते आशिष वारंग यांचे आकस्मिक निधन; मराठी, बॉलिवूड चित्रपट सृष्टीवर शोककळा
10
टियागो ७५००० रुपये, नेक्सॉन, हॅरिअर, सफारी खूपच स्वस्त झाली; टाटाने जीएसटी कपातीचे दर जाहीर केले
11
Bhagwant Mann: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती बिघडली; हॉस्पिटलमध्ये भरती केले
12
"ब्राह्मण नफा कमावतायेत...!"; ट्रम्प यांच्या सल्लागाराच्या विधानावर भारताचा जोरदार पलटवार, दिलं असं उत्तर!
13
धक्कादायक! अफगाणिस्तानमधील भूकंपामध्ये महिलांना कोण वाचवत नाहीत, तालिबानच्या कायद्यांमुळे बचावकार्यात अडथळे
14
चीन की पाकिस्तान, भारतासाठी सर्वात मोठा धोका कोण? सीडीएस अनिल चौहान यांनी स्पष्ट सांगितले
15
यांचे काहीतरी वेगळेच...! Vivo, सॅमसंग नाही, पाकिस्तानात चालतो हा मोबाईल ब्रँड; ऐकलाही नसेल...
16
'आम्ही रशियाकडून तेल खरेदी करत राहू'; केंद्रीय अर्थमंत्र्याचे मोठे विधान
17
"माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले?
18
हुआवेचा आणखी एक ट्रिपल फोल्डेबल फोन लॉन्च; सॅमसंग, शाओमी, विवो, ओप्पोची उडाली झोप!
19
प्रसिद्ध फुटबॉलपटू नेमारही अज्ञात होता...! अनोळखी अब्जाधीश १० हजार कोटींची संपत्ती सोडून गेला
20
चांदीच चांदी...! वॅगनआरवर 84 हजार, नेक्सॉनवर 1.55 लाखांपर्यंत जीएसटी कमी होणार; अल्टो, 3XO किंमती पहाल तर...

सिंचन विहिरींच्या लाभार्थींना प्रतीक्षाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 12:15 IST

आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये विशेष लक्ष देऊन समस्या निकाली काढण्याऐवजी त्या कायम ठेवण्याचा प्रकारही घडत असल्याचे चित्र आहे.

अकोला : आत्महत्याग्रस्त सहा जिल्ह्यांमध्ये धडक सिंचन विहिरी निर्मितीची योजना गेल्या आठ वर्षांपासून रडत-खडत सुरू आहे. विशेष म्हणजे, त्यामध्ये सातत्याने बदल केल्यानंतरही शेकडो लाभार्थी अद्यापही वंचितच आहेत. त्यामुळे आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये विशेष लक्ष देऊन समस्या निकाली काढण्याऐवजी त्या कायम ठेवण्याचा प्रकारही घडत असल्याचे चित्र आहे.अमरावती विभागातील पाच तसेच लगतच्या वर्धा जिल्ह्यातील मिळून ६६ तालुक्यांत ६६ हजार सिंचन विहिरींची धडक योजना २००९ मध्ये सुरू करण्यात आली. त्यासाठी शेतकऱ्यांकडून अर्ज मागवण्यात आले. भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडून गावांमध्ये लक्ष्यांकानुसार शेतकऱ्यांना विहिरी मंजूर झाल्या. २०११ मध्ये पालकमंत्र्यांच्या समितीने शेतकºयांची निवड यादी प्रसिद्ध केली. त्यावेळी ६३०० पर्यंत शेतकºयांची निवड करण्यात आली; मात्र सुरुवातीलाच विहिरींसाठीचा निधी १ लाख रुपये असल्याने त्यातून विहिरींची निर्मिती करणे अशक्य असल्याने लाभार्थींनी विहिरींची कामेच सुरू केली नाहीत. निधीत वाढ करण्याची मागणी सातत्याने करण्यात आली. त्यानंतर २०१४ मध्ये विहिरींसाठी निधीत २ लाख ५० हजार रुपये वाढ करण्यात आली. त्याचवेळी ज्या शेतकºयांनी अग्रिम घेऊन काम सुरू केले, त्यांनाच वाढीव निधी देण्याची अट टाकण्यात आली. त्यामुळे अत्यल्प प्रमाणात कामे सुरू केलेल्या शेतकºयांनाच त्याचा लाभ मिळाला. त्यानंतर शासनाने धोरणात बदल करत २०११ मध्ये निवड झालेल्या सर्वच शेतकºयांना विहिरी निर्मितीची संधी देण्यात आली. त्यासाठी कृषी विभागाच्या अधिकाºयांनी प्रत्येक शेतकºयांची भेट घेत त्यांच्याकडून विहिरींचे काम सुरू करण्यास तयार असल्याचे हमीपत्र घेण्यात आले. त्यावेळी जिल्ह्यातील ६४४ पेक्षाही अधिक शेतकºयांनी विहिरींचे काम सुरू करण्याचे पत्र लिहून दिले. त्यावेळी अकोला, तेल्हारा तालुके वगळता इतर पाच तालुक्यातील शेतकºयांना विहिरी पुनर्जीवित करण्याला मंजुरी देण्यात आली. त्यापैकी काही विहिरींना सुरुवातही झाली, तर अनेकांनी सुरू करण्याचे हमीपत्र दिल्यानंतरही त्यांच्या विहिरी मंजूर झालेल्या नाहीत. त्यातील आता ६६ विहिरींना मंजुरी देण्यात आली. हा प्रकार २०११ मध्ये निवड झालेल्या शेकडो विहीर लाभार्थींवर अन्यायकारक असल्याने हमीपत्र दिलेल्या सर्वच लाभार्थींच्या विहिरींना मंजुरी देण्याची मागणी आता होत आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाgovernment schemeसरकारी योजना