शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

प्रतीक्षा संपली, जिल्ह्यात शनिवारपासून कोरोना लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:47 IST

अकोला : जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाविरुद्ध लस निर्मिती झाल्यानंतर, १६ जानेवारीपासून देशभरात लसीकरणास प्रारंभ होणार आहे. याच अनुषंगाने आरोग्य ...

अकोला : जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाविरुद्ध लस निर्मिती झाल्यानंतर, १६ जानेवारीपासून देशभरात लसीकरणास प्रारंभ होणार आहे. याच अनुषंगाने आरोग्य विभागाने तयारी केली असून, जिल्ह्यात शनिवारपासून ८,८७८ फ्रंटलाइन आरोग्य कर्मचाऱ्यांना पाच केंद्रांवर लस दिली जाणार आहे. ऑक्सफर्ड आणि सिरम इन्स्टिट्यूटच्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन या दोन लसींच्या आपत्कालीन वापरास भारत सरकारने परवानगी दिली आहे. त्यानंतर, लसीकरणाची रंगीत तालीम म्हणून देशभरात ड्राय रन घेण्यात आला. अकोला जिल्ह्यातही आरोग्य विभागाने आठ जानेवारी रोजी लसीकरणाची रंगीत तालीम घेतली. जिल्ह्यात तब्बल ८,८७८ आरोग्य कर्मचाऱ्यांची ऑनलाइन यादी तयार करण्यात आली असून, या सर्व कर्मचाऱ्यांची नोंदणी कोविन ॲपमध्ये करण्यात आली आहे. लसीकरणारसाठी जिल्ह्यात पाच केंद्रांची निवड करण्यात आली असून, त्या दृष्टीने या केंद्रांवर व्यवस्थाही करण्यात आली आहे. जिल्ह्यात कोविशिल्ड ही लस देण्यात येणार आहे. आरोग्य विभागाला अद्याप लसीचे डोस प्राप्त झाले नसले, तरी येत्या एक ते दोन दिवसांत लस मिळण्याची शक्यता असून, शनिवारपासून लसीकरणास प्रारंभ होणार असल्याचे अधिकार्यांनी सांगितले.

या केंद्रांवर दिली जाणार लस

लसीकरणास प्रारंभ करण्याच्या दृष्टीने आरोग्य विभागाने जिल्ह्यात पाच केंद्रांची निवड केली आहे. यामध्ये जिल्हा स्त्री रुग्णालय, कोविड आयसीयू, ऑर्बीट हॉस्पीटल, मुर्तीजापूर येथील उपजिल्हा रुग्णालय व बार्शीटाकळी येथील ग्रामीण रुग्णालयाचा समावेश आहे. या पाच केंद्रांवर प्रत्येकी १०० अशा ५०० आरोग्य कर्मचाऱ्यांना १६ जानेवारी रोजी लस दिली जाणार आहे.

कशी दिली जाईल लस

लसीकरणासाठी जिल्ह्यातील ८,८७८ फ्रंटलाइन आरोग्य कर्मचार्यांची नोंदणी कोविन ॲपमध्ये करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांना लसीकरणाच्या एक दिवस आधी एसएमस पाठविले जाणार आहेत. केंद्रांवर प्रतीक्षा कक्ष, लसीकरण कक्ष व निरीक्षण कक्ष अशी व्यवस्था असेल. पहिल्या दिवशी ५०० कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. त्यानंतर, लसीच्या उपलब्धतेनुसार आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे.

सामान्य नागरिकांना मार्चपर्यंत प्रतीक्षा

पहिल्या टप्प्यात केवळ ८,८७८ फ्रंटलाइन आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. १६ जानेवारीपासून याची सुरुवात होणार आहे. सामान्य नागरिकांना मात्र लसीकरणासाठी मार्च महिना किंवा त्यापेक्षाही अधिक काळ प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

लसीकरणाच्या दृष्टीने आरोग्य विभागाने संपूर्ण तयारी केली आहे. लसीचे डोस अद्याप प्राप्त झाले नसले, तरी लवकरच ते प्राप्त होऊन १६ जानेवारीपासून लसीकरणास प्रारंभ केला जाईल. आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घेण्यासाठी तयार राहावे.

डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला