शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

व-हाडात कांदा उत्पादनावर भर!

By admin | Updated: August 12, 2015 22:54 IST

खरीप कांद्याचा प्रयोग यशस्वी, पण कमी पावसाचा बसला फटका.

अकोला : पश्‍चिम विदर्भात खरीप कांदा उत्पादनाकडे शेतकर्‍यांचा कल वाढला असून, याचे उत्पादन चांगले होत असल्याने अकोला जिल्हय़ात खरीप कांद्याच्या क्षेत्रात वाढ होत आहे; पण यंदा पावसाने ऐनवेळेवर दडी मारल्याने कांद्याच्या रोपवाटिका करपल्याने कांदा क्षेत्रात घट झाली आहे. कांदा उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी पश्‍चिम विदर्भात कांदा चाळी बांधण्याकडे कृषी विभागाने लक्ष केंद्रित केले आहे. अकोला जिल्हय़ात तर कांदा चाळी तयारही करण्यात आल्या आहेत. शेतकरी सामूहिक गटाने पुढाकार घेतल्याने या कांद्याच्या क्षेत्रात वाढ होत आहे. कांद्याचे उत्पादन कमी होत असताना, आत्मा आणि कृषी विभागाच्या पुढाकाराने कांदा पुन्हा बहरला आहे. कांदा बीजोत्पादन पिकापासून चांगले उत्पादन मिळत असल्यानेच शेतकरी कांदा बीजोत्पादनाकडे वळला आहे. या भागात कांदा उत्पादन वाफ्यानुसार घेतले जात आहे; परंतु सलग दोनशे हेक्टर कांदा काही ठिकाणी घेतला जात असून, यातून चांगला लाभ होत असल्याने शेतकरी गटाच्या सदस्यांमध्ये उत्साह वाढला आहे. कांदा हे पीक अल्पकाळात भरघोस उत्पन्न देणारे असल्याने या पिकावर शेतकरी गटांनी लक्ष केंद्रित केले आहे. अकोला जिल्हय़ात पातूर, अकोला, बाश्रीटाकळी तालुक्यात खरीप कांदा घेतला जातो. यंदाच्या खरीप हंगामात कांदा क्षेत्र वाढीचे उद्दिष्ट शेतकर्‍यांनी निश्‍चित केले होते. पातूर तालुक्यात ५00 एकर क्षेत्रावर कांदा लागवडीचे नियोजन करण्यात आले होते; तथापि पावसाने फटका दिल्याने रोपवाटिका करपल्या आहेत.