शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

मतदानाला चला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2017 01:54 IST

महापालिकेच्या २0 प्रभागातील ८0 जागांसाठी मंगळवारी मतदान प्रक्रिया पार पडेल.

अकोला, दि. २0- महापालिकेच्या २0 प्रभागातील ८0 जागांसाठी मंगळवारी मतदान प्रक्रिया पार पडेल. ८0 जागांसाठी संपूर्ण शहरातून विविध राजकीय पक्षांसह अपक्ष म्हणून ५७९ उमेदवार नशीब आजमावत आहेत. मतदानाच्या माध्यमातून संबंधित उमेदवारांच्या भाग्याचा फैसला मतदान यंत्रात बंद केला जाईल. यासाठी मनपाची यंत्रणा सज्ज झाली असून, शहरात पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. महापालिकेच्या चौथ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी २१ फेब्रुवारी रोजी मतदान होईल. याकरिता महापालिकेची प्रशासकीय यंत्रणा कार्यान्वित झाली आहे. मनपाची २00१ मध्ये स्थापना झाल्यानंतर तब्बल १६ वर्षांनंतर पालिका क्षेत्राच्या हद्दवाढीचा निर्णय घेण्यात आला. शासनाने ३१ ऑगस्ट २0१६ रोजी महापालिकेच्या हद्दवाढीवर शिक्कामोर्तब केले. शहरालगतच्या १३ प्रमुख ग्रामपंचायतींसह २४ गावांचा महापालिकेत समावेश झाला. प्रभागांची पुनर्रचना करताना २0 प्रभाग उदयास आले. प्रत्येक प्रभागात चार याप्रमाणे ८0 सदस्यांची संख्या निश्‍चित करण्यात आली. त्यापूर्वी ३६ प्रभागांमधून ७३ सदस्य निवडून आले होते. हद्दवाढीत सामील झालेल्या नवीन भागामुळे प्रभागांचे भौगोलिक क्षेत्रफळ कमालीचे विस्तारले आहे. २0 प्रभागांतील ८0 जागांसाठी मंगळवारी मतदान प्रक्रिया होत असून, विविध राजकीय पक्ष, अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार्‍या ५७९ उमेदवारांच्या निवडीचा फैसला मतदान यंत्रात बंद केला जाईल. मतदान प्रक्रियेसाठी प्रशासनाच्यावतीने ५८७ मतदान केंद्रं निश्‍चित करण्यात आले आहेत. याठिकाणी मतदानासाठी ईव्हीएम मशीन, कंट्रोल युनिट आदी व्यवस्था करण्यात आली असून, प्रत्येक मतदान केंद्रावर पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. राज्य निवडणूक आयोगाच्यावतीने करण्यात आले आहे. राज्य निवडणूक आयोगातर्फे वोटरस्लीप देण्यात येत आहे. त्यासुद्धा मतदान केंद्रावर जाऊन मतदान करण्याकरिता पुरेशा असेल. परंतु, जर मतदार स्लिपवर फोटो नसेल तर मात्र ओळख दर्शविणारा योग्य ते कागदपत्रे मतदारांनी सोबत ठेवावे, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे. मतदान केंद्रांच्या बाहेर १00 मीटर अंतरावर राजकीय पक्षांच्या बुथ प्रमुखांना बुथ उघडता येतील. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार मतदारांना माहिती देण्यासाठी उभारलेल्या मंडपात केवळ दोन व्यक्तींना (कार्यकर्ते) बसण्याची मुभा राहील. त्यापेक्षा जास्त कार्यकर्ते आढळल्यास कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.प्रत्येक मतदान केंद्राबाहेर उमेदवारांची माहिती !अकोला : आपल्या मतदारसंघात उभा असलेला उमेदवार कसा आहे, त्याचे शिक्षण किती, त्याच्यावर कोणत्या स्वरूपाचे किती गुन्हे दाखल आहेत, ही सर्व माहिती आता मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राबाहेर एका फलकावर लावण्यात येणार आहे. त्यामुळे मतदारांना सर्वच उमेदवारांची मतदान करण्यापूर्वीच संपूर्ण माहिती मिळणार आहे. यामध्ये उमेदवारांची सहा प्रकारची माहिती देण्यात येणार आहे. ३३ शस्त्रे जमा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर शहरातील शस्त्र परवानाधारकांनी त्यांचे शस्त्र पोलीस मुख्यालयात जमा केले आहेत. ३३ वर शस्त्र परवानाधारकांनी त्यांचे शस्त्र पोलीस दलाकडे सादर केले आहेत. शहरातील एकूण १८६ मतदान केंद्रे संवेदनशील असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली असून यामधील २४ मतदान केंद्रे हे अतिसंवेदनशील आहेत. या मतदान केंद्रांवर तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.