अकोला : विधानसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेत मतदान केंद्रांच्या परिसरात व्हिडीओ कॅमेर्यांद्वारे चित्रीकरण करण्यात येणार आहे. या चित्रीकरणाद्वारे प्रशासनामार्फत मतदान केंद्र परिसरातील घडामोडींवर ह्यवॉचह्ण ठेवण्यात येणार आहे. मतदान प्रक्रियेत मतदान केंद्र इमारत आणि परिसरामध्ये घडामोडींचे चित्रीकरण व्हिडीओ कॅमेर्यांद्वारे करण्यात येणार आहे. मतदान प्रक्रियेतील गैरप्रकारांवर लक्ष ठेवण्यासाठी प्रशासनामार्फत ही उपाययोजना करण्यात आली आहे. यासोबतच संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रांच्या परिसरात सूक्ष्म निरीक्षकांचे विशेष लक्ष राहणार असून, मतदान केंद्र परिसरातील घडामोडींचे सीसी कॅमेर्यांद्वारे चित्रीकरण करण्यात येणार आहे. अकोला पश्चिम मतदारसंघातील १९ अतिसंवेदनशील मतदारसंघात सीसी कॅमेरे लावण्यात आले असून, त्याद्वारे मतदान केंद्रांवरील घडामोडींवर लक्ष ठेवणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद देशमुख यांनी सांगितले.
मतदान प्रक्रियेत घडामोडींवर ‘वॉच’
By admin | Updated: October 15, 2014 01:33 IST