शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

‘व्हीएनआयटी’ची चमू करणार सिमेंट रस्त्यांची तपासणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 10:34 IST

नमुने घेतल्यानंतर आता पुन्हा एकदा ‘व्हीएनआयटी’च्या चमूकडून रस्त्यांची अंतिम तपासणी केली जाणार असल्याची माहिती आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शहरातील दर्जाहीन व निकृष्ट ठरलेल्या सिमेंट रस्त्यांच्या तपासणीसाठी मनपाने नियुक्त केलेल्या नागपूर येथील ‘व्हीएनआयटी’च्या चमूने सिमेंट रस्त्याचे नमुने घेतले होते. नमुने घेतल्यानंतर आता पुन्हा एकदा ‘व्हीएनआयटी’च्या चमूकडून रस्त्यांची अंतिम तपासणी केली जाणार असल्याची माहिती आहे. त्यानंतरच महापालिकेला अहवाल सोपवला जाईल.शहरातील रस्ते दुरुस्तीसाठी तत्कालीन राज्य शासनाने दिलेल्या कोट्यवधींच्या निधीचा पारदर्शी कारभाराचा दावा करणाऱ्या सत्ताधारी भाजपच्या कालावधीत अक्षरश: चुराडा झाल्याचे समोर आले आहे. शहरात तयार करण्यात आलेल्या सिमेंट रस्त्यांवर अवघ्या सहा महिन्यात जागोजागी खड्डे पडल्यामुळे मनपा प्रशासनासह सत्ताधारी भाजपाची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. मनपाचे तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी निविदा प्रसिद्ध झाल्यानंतर ‘वर्किंग एस्टीमेट’मध्ये बदल करून १८ फूट रुंदीचे रस्ते ४० फूट रुंद करण्याचा निर्णय घेतला. तसेच यापैकी प्रमुख रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी लागणारा निधी शासनाकडून घेण्यात आला. रस्ते रुंदीकरणामुळे शहराचा चेहरामोहरा बदलण्यास मदत झाली असली तरी त्याच्या निकृष्ट दर्जामुळे गालबोट लागल्याचे समोर आले आहे. स्थानिक ‘आरआरसी’ कन्स्ट्रक्शनमार्फत सिमेंट रस्त्यांची कामे करण्यात आली होती. सदर कामावर देखरेखीसाठी नियुक्त करण्यात आलेले मनपाचे अभियंता कुचकामी ठरल्यामुळेच सिमेंट रस्त्यांचे पितळ उघडे पडले आहे.

३९ नमुने घेतले; निष्कर्षाकडे लक्षशहरात जुलै महिन्यात दाखल झालेल्या ‘व्हीएनआयटी’च्या चमूने सिव्हिल लाइन ते मुख्य पोस्ट आॅफिस चौक, माळीपुरा ते मोहता मिल, दुर्गा चौक ते अग्रसेन चौक तसेच टॉवर ते रतनलाल प्लॉट चौकपर्यंत रस्त्याचे एकूण ३९ नमुने घेतले आहेत. नमुन्यांची तपासणी केल्यानंतर ‘व्हीएनआयटी’कडून काय निष्कर्ष निघतात, याकडे संपूर्ण अकोलेकरांचे लक्ष लागले आहे.

सत्तापक्षाकडून पाठपुरावा नाहीच!महापालिकेच्या राजकारणात पारदर्शी कारभाराचा डंका पिटणाºया सत्ताधारी भाजपच्या कालावधीत विविध योजनांमध्ये घोळ होत असल्याचे समोर येत आहे. सिमेंट रस्ते प्रकरणात काही पदाधिकारी व स्थानिक नेत्यांची भूमिका संशयाच्या घेºयात असल्यामुळे की काय, मनपातील सत्तापक्षाकडून सिमेंट रस्त्यांच्या चौकशीसंदर्भात कोणताही पाठपुरावा केला जात नसल्याचे दिसून येत आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका