शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
4
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
5
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
6
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
7
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
8
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
9
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
10
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
11
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
12
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
13
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
14
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
15
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
16
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
17
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
19
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
20
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय

वऱ्हाडी भाषेच्या जतनासाठी विठ्ठल वाघांनी केली पायपीट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2020 11:01 IST

प्राचार्य डॉ. विठ्ठल वाघ हे नाव महाराष्ट्राला नवे नाही. अकोल्यात तर नाहीच. विद्यार्थीप्रिय प्राध्यापक आणि प्राचार्य. श्री शिवाजी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात डॉ. वाघ १९६३-६४ या शैक्षणिक वर्षापासून प्राध्यापक होते.

- नीलिमा शिंगणे-जगड  अकोला: अवघ्या महाराष्ट्राला आपल्या कवितांनी वेड लावणारे लोककवी विठ्ठल वाघ. सिनेमा, गीत, गद्य-पद्य, ललित अशा साहित्याच्या प्रकारांमध्ये विठ्ठल वाघांनी सफर केली आहे; मात्र वºहाडी भाषा चिरकाल टिकावी, यासाठी त्यांनी पायपीट केली. वाघ यांनी जवळपास ३३ तालुक्यांचा दौरा करू न, म्हणी व शब्द गोळा केले. सुमारे २५ हजार वºहाडी शब्दांचा त्यांनी संग्रह केला आहे. वºहाडी ही मराठीची मायकूस आहे. त्यामुळे वºहाडी भाषेचा शब्दकोश तयार करण्याचे काम वयाच्या पंचाहत्तरीत डॉ. वाघ करीत आहेत, हे येथे उल्लेखनीय. आज प्राचार्य डॉ. विठ्ठल वाघ यांचा रविवार, १९ जानेवारी रोजी अमृत महोत्सव सोहळा साजरा होत आहे.प्राचार्य डॉ. विठ्ठल वाघ हे नाव महाराष्ट्राला नवे नाही. अकोल्यात तर नाहीच. विद्यार्थीप्रिय प्राध्यापक आणि प्राचार्य. श्री शिवाजी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात डॉ. वाघ १९६३-६४ या शैक्षणिक वर्षापासून प्राध्यापक होते. २००० ते २००५ पर्यंत त्यांनी प्राचार्यपद भूषविले. विद्यार्थ्यांची आपुलकीने विचारपूस करीत असल्याने आजही ते विद्यार्थीप्रिय आहेत. याची साक्ष अमृतमहोत्सवी सोहळ्याला महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी हजेरी लावत आहेत.वाघ यांच्या भाषेत सांगायचे झाल्यास, भाषेची समृद्धी तिच्या शब्दसंख्येवर अवलंबून असते. ज्या भाषेत शब्द अधिक, ती भाषा समृद्ध. मराठीत सुमारे सव्वालाख शब्द आहेत. डॉ. वाघ वºहाडी भाषेचा शब्दकोश तयार करण्याचे काम सध्या करीत आहेत.सुमारे २५ हजार वºहाडी शब्दांचा संग्रह त्यांनी केला आहे. वºहाडी, अहिराणी, मराठवाडी, कोकणी अशा विविध बोलींमध्ये असलेले असंख्य शब्द प्रमाणभाषेत दिसत नाही. या शब्दाचा कोश करू शकलो, तर बोली भाषेसोबतच मराठी भाषा समृद्ध होईल. महाराष्ट्र सरकारच्या साहित्य आणि संस्कृती मंडळाने शब्दसंग्रह वाढविण्यासाठी पुढाकार घेतल्यानंतर प्रत्येक विद्यापीठाच्या आसपासच्या जिल्ह्यातील बोलीभाषेतील शब्दांचा संग्रह करण्याचे काम सुरू केले. त्यासाठी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने डॉ. विठ्ठल वाघ यांची नेमणूक केली होती. वाघ यांनी ३३ तालुक्यांचा दौरा करू न, काही म्हणी व शब्द गोळा केले. वाघ यांनी अमरावती, अकोला, बुलडाणा, जळगाव व औरंगाबाद या पाच जिल्ह्यांतून पायी हिंडून, काव्ययात्रेतून समाजप्रबोधन केले. अमेरिका, कॅनडा या देशांत काव्यगायनाचे २२ कार्यक्रम केले. वाघ हे महाराष्ट्रातील शालेय मराठीचे पाठ्यपुस्तक बालभारतीचे संपादन प्रमुख होते.गीत, पटकथा व संवाद लेखनमराठी चित्रपट ‘अरे संसार संसार’ यामधील ‘काळ्या मातीत मातीत...तिफण चालते’ या डॉ. विठ्ठल वाघ यांच्या गीताला गीत लेखनासाठी पुरस्कार प्राप्त झाला आहे. देवकीनंदन गोपाला चित्रपटाचे गीत, पटकथा, संवाद लेखनास पुरस्कार, राघू मैना चित्रपटाची पटकथा, संवाद, लेखन, शंभू महादेवाचा नवस चित्रपटाचे गीत लेखन, दूरचित्रवाणीवरील काज या मालिकेचे पटकथा, संवाद लेखन, गोट्या या अजरामर मालिकेचेदेखील पटकथा आणि संवाद लेखन डॉ. वाघ यांनी केले.

संमेलनाध्यक्षपुण्याचे औंध साहित्य संमेलन, पहिले महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन, नववे कामगार साहित्य संमेलन, पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचे बार्शी येथे भरलेले विभागीय साहित्य संमेलन, अंबाजोगाई येथील बोली साहित्य संमेलन, मुखेड येथील मायबोली साहित्य संमेलन, देहू येथील दुसरे यशवंतराव चव्हाण ग्रामजागर साहित्य संमेलन, कारंजा लाड येथील ४५ वे विदर्भ साहित्य संमेलन, सोळावे अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन, चांदुर रेल्वे येथील चौथे शब्दगंध मराठी साहित्य संमेलन, सोलापूर येथील पाहिले कृषी साहित्य संमेलन, संत गाडगेबाबा विचार साहित्य संमेलन व अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन.

टॅग्स :Akolaअकोलाliteratureसाहित्य