अकोला, दि. ११- महानगरपालिका निवडणुकीच्या तारखांची घोषणा झाल्यानंतर बुधवारी राजकीय घडामोडींनी वेग घेतला . त्यामध्ये शिवसेनेचे सहायक संपर्कप्रमुख ङ्म्रीरंगदादा पिंजरकर यांनी माजी मंत्री गुलाबराव गावंडे यांच्या आङ्म्रमाला दिलेल्या भेटीची भर पडली आहे. पिंजरकर यांच्या भेटीमुळे गावंडे हे पुन्हा सेनेत परतत असल्याच्या तर्कविर्तकांना उधाण आल्याने गावंडे यांचा आङ्म्रम हा राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू बनला. शिवसेनेचे ह्यबाळकडूह्ण घेत पहिल्या फळीतील नेतृत्व अशी माजी मंत्री गुलाबराव गावंडे यांची राज्यभर ओळख आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी सेनेला ह्यजय महाराष्ट्रह्ण ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेऊन गावंडे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर पवार यांच्या उपस्थितीत अकोल्यात भव्य मेळावा घेण्याचे त्यांनी जाहीर केले होते. या मेळाव्यासाठी पवार यांच्या तारखांचा मेळ लावण्याचा प्रयत्न गावंडे यांच्याकडून होत असल्याची माहिती राजकीय वतरुळात असतानाच शिवसेनेचे ङ्म्रीरंग पिंजरकर यांच्या आङ्म्रम भेटीने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. बुधवारी दुपारी पिंजरकर व शिवसेनेच्या काही जुन्या जाणत्या मंडळींनी गावंडे यांच्या आङ्म्रमाला भेट देत, त्यांच्याशी तासभर चर्चा केली. या चर्चेतील तपशील समोर आला नसला, तरी पिंजरकरांसह काही सैनिकांनी गुलाबरावांना सेनेत परत बोलाविण्याची गळ घातल्याची चर्चा दिवसभर शिवसेना व राष्ट्रवादीच्या वतरुळात सुरू होत्या; मात्र या चर्चेला अधिकृत दुजोरा मिळाला नाही. गुलाबराव गावंडे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही, तर पिंजरकर यांनी भेट घेतल्याचा दुजोरा देऊन ,भेटीचे कारण गुलदस्त्यातच ठेवले. मनपा निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाल्यामुळे पिंजरकर-गावंडे भेट कशासाठी, हा प्रश्न सध्यातरी अनुत्तरित आहे. यासंदर्भात शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरविंद सावंत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही या विषयावर बोलण्यास नकार दिला.
पिंजरकरांची आश्रमाला भेट; तर्कवितर्कांना उधाण !
By admin | Updated: January 12, 2017 02:27 IST