शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
2
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
3
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
4
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
5
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
6
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
7
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
8
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
9
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
10
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
11
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
12
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
13
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
14
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
15
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत
16
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
17
टाटा मोटर्सचा ऐतिहासिक निर्णय! 'या' दिवशी कंपनीचे होणार विभाजन; तुम्हाला काय फायदा?
18
व्हायरल होण्याचं भूत, मिठी मारुन कपलची कालव्यात उडी; Video पाहून वाढेल हृदयाची धडधड
19
"भावांनो, असं आयुष्य कोण जगेल..."; कौटुंबिक वादातून पतीनं संपवलं जीवन, मृत्यूपूर्वी दीड मिनिटांचा Video
20
ट्रम्प यांच्या ५०% टॅरिफनं मुकेश अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर घसरला? ₹१७ वर आला भाव!

‘लायन्स दृष्टी’ करणार ४ लाख विद्यार्थ्यांची ‘व्हिजन स्क्रिनिंग टेस्ट’!

By admin | Updated: October 7, 2015 22:50 IST

सामाजिक उपक्रम एकाच दिवशी होणार १४ जिल्हय़ांमध्ये चाचणी.

अतुल जयस्वाल/अकोला: सामाजिक क्षेत्रात काम करणारी जगातील सर्वात मोठी संस्था 'लायन्स क्लब इंटरनॅशनल'च्या भारतातील शाखांपैकी एक असलेल्या 'डिस्ट्रिक्ट ३२३ एच-२' यांच्यावतीने त्यांच्या कार्यक्षेत्रात येणार्‍या महाराष्ट्रातील १४ जिल्हय़ांमध्ये गुरुवार, ८ ऑक्टोबर रोजी तब्बल ४ लाख शालेय विद्यार्थ्यांची 'व्हिजन स्क्रिनिंग टेस्ट' करण्यात येणार आहे. या सर्व विद्यार्थ्यांची वेगवेगळय़ा ठिकाणी एकाच दिवशी ही चाचणी घेण्यात येणार आहे. या उपक्रमाची नोंद 'लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये केली जाणार आहे. 'लायन्स क्लब इंटरनॅशनल' या जगातील सर्वात मोठय़ा सामाजिक संस्थेला वर्ष २0१७ मध्ये शंभर वर्ष पूर्ण होत आहेत. शतकपूर्ती महोत्सवानिमित्त जगभर विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून या संस्थेच्या महाराष्ट्रातील चार शाखांपैकी एक असलेल्या लायन्स डिस्ट्रिक्ट ३२३ एच -२ यांच्यावतीने 'लायन्स दृष्टी' हा उपक्रम सुरू केला आहे. या लायन्स क्लबचे डिस्ट्रिक अँक्टिव्हिटी चेअरपर्सन डॉ. संजय वोरा यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या उपक्रमांतर्गत डिस्ट्रिक्ट ३२३ एच -२ च्या कार्यकक्षेत येत असलेल्या महाराष्ट्रातील अकोला, वाशिम, बुलडाणा, हिंगोली, जालना, परभणी, औरंगाबाद, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, जळगाव, धुळे, नंदुरबार या १४ जिल्हय़ांमध्ये ८ ऑक्टोबर रोजी ५00 पेक्षाही अधिक शाळांमधील विद्यार्थ्यांची व्हिजन स्क्रिनिंग टेस्ट केली जाणार आहे. एकट्या अकोला शहरात जवळपास २0 हजार विद्यार्थ्यांची ही टेस्ट करण्यात येणार आहे. यासाठी गत महिनाभरापासून विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आली. तसेच तेथील शिक्षकांनाच 'व्हिजन स्क्रिनिंग'चे प्रशिक्षण देण्यात आले. अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम असून, विविध केंद्रांवरच्या विद्यार्थ्यांच्या चाचणीबाबतच्या नोंदी वाशिम येथील मुख्य केंद्रावर पाठविण्यात येतील. तेथे त्याची नोंद 'लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये केली जाणार असल्याची माहिती डिस्ट्रिक्ट चेअरपर्सन कौशल भाटिया यांनी दिली. *अशी होईल चाचणी या उपक्रमांतर्गत नोंदणी करण्यात आलेल्या सर्वच शाळेतील शिक्षकांना व्हिजन स्क्रिनिंगचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यानुसार शिक्षक विद्यार्थ्यांंना नेत्रतज्ज्ञांनी पुरविलेल्या फलकाचे अवलोकन एका विशिष्ट अंतरावरून करण्यास सांगतील. या फलकावर काही अक्षरे रेखाटलेली असतात. विद्यार्थ्यांची दृष्टी नीट असेल, तर ते बिनचूक ही अक्षरे ओळखतील. ज्यांना अक्षरे नीट ओळखण्यात समस्या आली, तर त्यांना नेत्रतज्ज्ञांकडे जाण्याचा सल्ला दिला जाईल.