जिल्ह्यातील प्रकल्पांच्या जलसाठ्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. काटेपूर्णा धरणातून सोमवारी दोन वक्रद्वार उघडून ५०.१६ घ.मी.सें. एवढा साठा विसर्ग सुरू होता. अखेर मंगळवारी सकाळी १० वाजता काटेपूर्णा प्रकल्पातून नदीपात्रात करण्यात येत असलेला विसर्ग बंद करण्यात आला. पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढविणे/कमी करणेबाबत पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मंगळवारी सकाळी १० वाजेपर्यंत काटेपूर्णात ३४७.३९ मी., ९३.०४ टक्के साठा उपलब्ध होता.
------------------------
वान प्रकल्पाचे दोन वक्रद्वार १० सेंमीने उघडले
तेल्हारा तालुक्यातील वान प्रकल्पातून मंगळवारी सायंकाळी ७ वाजता नदीपात्रात होत असलेला विसर्ग २१.८२ घ.मी./से. वरून कमी करून १०. ६६ घ.मी./से.एवढा करण्यात आला. त्यामुळे प्रकल्पाचे दोन वक्रद्वारे प्रत्येकी १० सेंमी उंचीने उघडून नदीपात्रात विसर्ग सोडण्यात येत आहे. नदी काठच्या गावांतील नागरिकांनी सावध राहण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.