शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
3
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
4
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
5
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
6
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
7
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
8
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
9
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
10
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
11
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
12
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
13
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
14
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
15
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
16
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
17
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
18
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
19
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
20
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...

मृत्यूच्या जबड्यातून वाचविले कन्यारत्न !

By admin | Updated: January 23, 2015 01:33 IST

मातापित्याची धडपड : बेटी बचाओ अभियानासाठी आदर्श.

सुभाष मोर/ नांद्रा (लोणार, जि. बुलडाणा):पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या ह्यबेटी बचाओह्ण मोहिमेला २२ जानेवारी रोजी बुलडाण्यात प्रारंभ झाला. या पृष्ठभूमीवर मुलगी वाचविण्यासाठी माता-पित्याने केलेल्या धडपडीची एक उदाहरण लोणार तालुक्यातील धाड येथून समोर आले आहे. गुदद्वार नसलेले जगावेगळे व्यंग घेऊन जन्माला आलेल्या एका अभागी बालिकेवर उपचारांची शर्थ करून तिला जीवनदान दिले आहे.लोणार तालुक्यातील धाड या छोट्याशा गावचे रवींद्र मदनलाल जाजड व संतोषी रवींद्र जाजड या दाम्पत्यला दहा महिन्यापूर्वी एक सुंदर मुलगी जन्माला आली. मुलीच्या जन्मामुळे आनंदीत झालेल्या माता पित्याने तिचे नाव आस्था ठेवले; परंतु जन्मापासूनच नियतीने तिचा सूड व तिच्या आई-वडिलांची परीक्षा घेण्याचा जणू चंगच बांधला. जन्मवेळीच आस्थाचे वजन केवळ एकच किलो होते. त्यामुळे तिला एक महिना अतिदक्षता विभागात ठेवावे लागले. घरी आणल्यानंतर आस्थाला अंघोळ घालताना आस्थाला जन्मत: गुदद्वारच नव्हते, हे तिच्या आईच्या लक्षात आले. दवाखान्यात जवळपास एक महिना तिने लघवीवाटेच संडाससुद्धा केल्याने हे डॉक्टरसह कोणाच्याच लक्षात आले नाही; परंतु जेव्हा हे आई-वडिलांच्या लक्षात आले तेव्हा मात्र त्यांना धक्काच बसला. तरीपण त्यांनी खचून न जाता सर्वतोपरी उपचार करुन तिला जीवनदान देण्याचा पक्का निर्धार केला. त्यानंतर आस्थाच्या उपचारासाठी औरंगाबाद, शिर्डी, नाशिक, नागपूर आदी सर्व ठिकाणे पालथी घातली. शेवटी अमरावती येथे उपचार करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा डॉक्टरांनी तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी आस्थाचे वजन वाढविणे गरजेचे असल्याचे सांगितले. नंतर अवघ्या पाच महिन्यातच तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर परत दुसरी शस्त्रक्रिया करुन शौचास करण्यासाठी पोटाच्या डाव्या बाजूला जागा करण्यात आली. आता मार्च २0१५ या महिन्यात तिसरी शस्त्रक्रिया करण्यात येणार असून, त्यानंतर आस्था अगदी सामान्यपणे सर्व क्रिया करु शकणार आहे. हा सर्व प्रकार सांगताना, मातापित्यांच्या चेहर्‍यावर एखादी फार मोठी लढाई जिंकल्याचा आनंद ओसंडून वाहत होता. अवघ्या दहा महिन्याच्या वयामध्ये तीन शस्त्रक्रियांना सामोरे जावून आस्था अगदी आनंदी दिसते. रवींद्र जाजड यांच्याकडे कोणत्याच प्रकारची नोकरी धंदा, शेती नसून केवळ रोजंदारीच्या भरवशावर ते हा संघर्ष पेलत आहेत. गर्भातच मुलीची हत्या करणार्‍या, तसेच जन्मानंतरही मुलीला शाप मानणार्‍यांसाठी जाजड यांनी आपल्या सत्कृतीतून एक आदर्श निर्माण केला आहे.