शहरं
Join us  
Trending Stories
1
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
पाकव्याप्त काश्मीरमध्ये सैन्याची थट्टा; फक्त १० रुपयांत गणवेश-हेल्मेट विक्रीला, व्हिडीओ व्हायरल
4
तुम्हीही टोल भरताय? मग जाणून घ्या, देशात 'या' लोकांना नियमानुसार मिळते टोलमधून थेट सूट!
5
हात पकडून जोरात ओढले..; तीन वर्षीय चिमुकलाने वाचवला आईचा जीव; पाहा धक्कादायक Video
6
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
7
भारतीय कंपनी आणतेय ७००० mah बॅटरीवाला प्रिमिअम फोन, ‘Pixel’ सारखा कॅमेरा डिझाइन; पण किंमत नसेल स्वस्त...
8
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
9
दसरा मेळाव्यानंतर नवा वाद! रामदास कदमांचा धक्कादायक दावा, संजय राऊतांचं संतप्त प्रत्युत्तर
10
माणसाचं तारुण्यच 'संकटात', नवीन विषाणुमुळे...; बाबा वेंगाची हादरवून टाकणारी भविष्यवाणी काय?
11
ITR चुकला? घाबरू नका, 'या' तारखेपर्यंत भरा बिलिटेड रिटर्न; पण, इतका दंड आणि व्याज भरावे लागणार
12
"भारतीय कंपन्या 'क्रोनीझम'ने नाही, तर..", राहुल गांधींचे कोलंबियातून भाजपवर टीकास्त्र
13
Video - अग्निकल्लोळ! लॉस एंजेलिसमध्ये रिफायनरीला भीषण आग, परिसरात धुराचं साम्राज्य
14
मारुतीचं साम्राज्य धोक्यात...? ह्यूंदाई-महिंद्राला पछाडत 'ही' कंपनी बनली देशातली No.2 ब्रँड! 'MS' पासून फक्त एक पाऊल दूर
15
हृदयद्रावक! कफ सिरप पिऊन झोपला अन् उठलाच नाही; मोफत औषधामुळे मुलाचा मृत्यू
16
Bigg Boss 19: आता खरी मजा येणार! भारतीय क्रिकेटरची बहीण 'बिग बॉस'च्या घरात येणार, कोण आहे ती?
17
पाशांकुश एकादशीला 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; काय घ्यावी काळजी? वाचा!
18
उद्धव ठाकरेंची सोडली साथ, शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करताच राजन तेली म्हणाले, "दुर्दैवाने तिथे..."
19
डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का! 'भारतातून मालाची आयात वाढवण्याचे पुतिन यांचे आदेश; पंतप्रधान मोदींचे कौतुकही केले
20
एआयपासून बनलेली जगातील पहिली अभिनेत्री, ओळखून दाखवणं कठीण; कलाकारांकडून तीव्र निषेध!

निवडणुकांच्या गावांत थांबले कर्जमाफीच्या अर्जांंचे चावडी  वाचन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 01:50 IST

अकोला : ग्राम पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका असलेल्या  गावांमध्ये कर्जमाफीच्या अर्जांंचे चावडी वाचन करण्यात येऊ   नये, असे राज्य निवडणूक आयोगाचे पत्र प्राप्त झाले. त्यानुषंगाने  जिल्ह्यातील ग्राम पंचायतींच्या निवडणुका असलेल्या गावांमध्ये  कर्जमाफीसाठी शेतकर्‍यांनी भरलेल्या अर्जांंचे चावडी वाचन  थांबविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्या तील उपविभागीय अधिकारी (एसडीओ )आणि तहसीलदारांना  बुधवारी देण्यात आल्या.

ठळक मुद्देनिवडणूक आयोगाच्या एसडीओ-तहसीलदारांना सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : ग्राम पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका असलेल्या  गावांमध्ये कर्जमाफीच्या अर्जांंचे चावडी वाचन करण्यात येऊ   नये, असे राज्य निवडणूक आयोगाचे पत्र प्राप्त झाले. त्यानुषंगाने  जिल्ह्यातील ग्राम पंचायतींच्या निवडणुका असलेल्या गावांमध्ये  कर्जमाफीसाठी शेतकर्‍यांनी भरलेल्या अर्जांंचे चावडी वाचन  थांबविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्या तील उपविभागीय अधिकारी (एसडीओ )आणि तहसीलदारांना  बुधवारी देण्यात आल्या.सन २00९ ते ३0 जून २0१६ पर्यंंत राज्यातील थकबाकीदार शे तकर्‍यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.  त्यानुसार कर्जमाफी योजनेंतर्गत थकबाकीदार शेतकर्‍यांना दीड  लाख रुपयांपर्यंंत कर्जमाफी देण्यात येणार असून, कर्जाची  नियमित परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांना २५ हजार रुपयांपर्यंंंत  प्रोत्साहनपर अनुदान आणि कर्जाचे पुनर्गठन करण्यात आलेल्या  शेतकर्‍यांना विशेष योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.  त्यानुषंगाने थकबाकीदार शेतकर्‍यांचे कर्जमाफीचे ऑनलाइन  अर्ज शासनाच्या ‘आपले सरकार’ या संकेत स्थळावर भरण्यात  आले.  जिल्हय़ातील महा ई-सेवा केंद्र, सामूहिक सेवा केंद्र  (सीएससी) व आपले सरकार सेवा केंद्र इत्यादी सेतू केंद्रांवर गत  २४ जुलै ते २२ सप्टेंबरपर्यंंत थकबाकीदार शेतकर्‍यांचे  कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरण्यात आले. मुदतीपर्यंंंत  जिल्हय़ात १ लाख ३८ हजार ९६२ शेतकर्‍यांचे कर्जमाफीचे  ऑनलाइन अर्ज भरण्यात आले. कर्जमाफीसाठी शेतकर्‍यांनी  ऑनलाइन भरलेल्या अर्जाचे चावडी वाचन जिल्हय़ातील  गावागावांत २७ व २८ सप्टेंबर रोजी करण्याचे नियोजन  जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले होते. त्यानुसार  चावडी वाचनाला २७ सप्टेंबर रोजी सुरुवातदेखील करण्यात  आली. दरम्यान, ग्राम पंचायतींच्या निवडणुका असलेल्या  ठिकाणी कर्जमाफीच्या अर्जांचे चावडी वाचन करण्यात येऊ  नये, अशा सूचनांचे पत्र राज्य निवडणूक आयोगामार्फत २७ स प्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाले. त्यानुसार  ग्रामपंचायतींच्या निवडणुका असलेल्या गावांमध्ये  कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज भरलेल्या शेतकर्‍यांच्या याद्यांचे  चावडी वाचन थांबविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी  कार्यालयामार्फत जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी आणि  तहसीलदारांना देण्यात आल्या. त्यामुळे ग्राम पंचायतींच्या  निवडणुका असलेल्या गावांमध्ये कर्जमाफीच्या अर्जांंंचे चावडी  वाचन थांबले आहे.

३१९ ग्रामपंचायत स्तरावर झाले चावडी वाचन!कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज भरलेल्या जिल्ह्यातील शेतकरी  याद्यांच्या  चावडी वाचनास २७ सप्टेंबरपासून जिल्ह्यात सुरुवात  करण्यात आली. पहिल्या दिवशी ३१९ ग्रामपंचायत स्तरावर  चावडी वाचन करण्यात आले. त्यामध्ये अकोला-४५, अकोट  -४५,तेल्हारा-६९,बाश्रीटाकळी-४५, बाळापूर -३0, पातूर -२१  व मूर्तिजापूर तालुक्यात -६४ ग्राम पंचायत स्तरावर अर्जांंंच्या  माहितीचे चावडी वाचन करण्यात आले.

राज्य निवडणूक आयोगामार्फत प्राप्त झालेल्या मार्गदर्शन  पत्रानुसार जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका असलेल्या  गावांमध्ये कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज भरलेल्या शे तकर्‍यांच्या याद्यांचे चावडी वाचन करण्यात येऊ नये, अशा  सूचना जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी-तहसीलदारांना  देण्यात आल्या आहेत.- राजेश खवलेप्रभारी अपर जिल्हाधिकारी