शहरं
Join us  
Trending Stories
1
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
2
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
3
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
4
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
5
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
6
Crime News : पुन्हा निळ्या ड्रमचे प्रकरण आले, बायको घरमालकाच्या प्रेमात पडली; पतीला संपवले अन्...
7
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन
8
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
9
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
10
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
11
सोहम बांदेकरचं 'ठरलं तर मग'! 'या' अभिनेत्रीसोबत बांधणार लग्नगाठ? होतोय अभिनंदनाचा वर्षाव
12
Asia Cup 2025 : गिलमुळे धोक्यात होतं तिलक वर्माचं स्थान; शेवटी BCCI निवडकर्त्यांनी असा काढला तोडगा
13
गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?
14
मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...
15
Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!
16
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
17
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
18
दहावीतील विद्यार्थ्याची नववीतील विद्यार्थ्याने केली हत्या, चाकूने सपासप वार केले आणि...  
19
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
20
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु

ग्रामस्थाने भडकावली पोलीस शिपायाच्या श्रीमुखात

By admin | Updated: September 12, 2016 20:43 IST

मूर्तिजापूर पोलीस स्टेशन येथील पोलीस कर्मचारी सर्वेश कांबे यांना मारहाण करण्यात आली.

ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. १२ - आरोपींना न्यायालयीन समन्स बजावण्यासाठी गेलेल्या पोलीस शिपायाच्या कानशिलात एका ग्रामस्थाने लगावली. ही घटना १२ सप्टेंबर रोजी घडली. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मारहाण करणाºयाविरुद्घ गुन्हा दाखल केला आहे. 
     
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार काही आरोपींचा न्यायालयीन समन्स घेऊन  शिपाई  सर्वेश कांबे हा काँस्टेबल आठवले यांच्यासह तुरखेड या गावात  सोमवारी सकाळी साडेदहाच्या दरम्यान समन्स घेऊन धडकले. गावात दाखल होताच समोर दिसलेल्या गजानन काळे नावाच्या मध्यमवयीन गृहस्थास त्यांनी आपल्या जवळचा कागद दाखवून संबंधित इसमांचा पता विचारला, काळे याने या समन्स मधील काही आरोपी तुरखेड या गावात राहत असल्याचे प्रत्युत्तर देऊन  निघाले असता  ‘त्यांचे घर जरा आम्हाला दाखवा ना’, अशी लगेच विचारणा करणाºया सर्वेश कांबे या शिपायाला काळे याने अश्लील शिवीगाळ करून धमकी देत  त्याच्या कानशिलात लगावली.
 
अचानक घडलेल्या या प्रकाराने गोंधळून गेलेल्या शिपायाने तडक पोलीस ठाणे गाठले. झाला प्रकार ठाणेदार वाघू खिल्लारे यांच्या निदर्शनास आणला. त्यांनी घटनास्थळाला भेट दिली. आरोपीला ताब्यात घेण्यात आले. 
     
 
उपविभागीय पोलीस अधिकारी कल्पना भराडे व शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार गजानन पडघन यांनीही ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेतली. घटनास्थळाला भेट देऊन भराडे यांनी तपास व कार्यवाहीबाबत ठाणेदारांना आवश्यक सूचना दिल्या. गजानन जानराव काळे (५०) या आरोपीला ताब्यात घेण्यात आले. सर्वेश कांबे यांच्या फिर्यादीनुसार अश्लील शिवीगाळ करणे, धमकी देणे तसेच शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी भादंविच्या अनुक्रमे २९४, ५०६ व ३५३ कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून एसडीपीओ कल्पना भराडे व ठाणेदार वाघू खिल्लारे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक प्रतापसिंग सोळंके तपास करीत आहेत.