दोन हजारांची लाच घेताना ग्रामउद्योग अधिकारी एसीबीच्या जाळ््यात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 22:24 IST
अकोला : वीटभट्टी उद्योग उभारणीसाठी लागणाºया कर्जासाठी आॅनलाइन अर्ज भरावा लागणार असल्याचे सांगत तक्रारकर्त्याकडून दोन हजाराची लाच स्वीकारताना प्रभारी ...
दोन हजारांची लाच घेताना ग्रामउद्योग अधिकारी एसीबीच्या जाळ््यात!
अकोला : वीटभट्टी उद्योग उभारणीसाठी लागणाºया कर्जासाठी आॅनलाइन अर्ज भरावा लागणार असल्याचे सांगत तक्रारकर्त्याकडून दोन हजाराची लाच स्वीकारताना प्रभारी जिल्हा ग्राम उद्योग अधिकाºयास रंगेहात अटक करण्यात आली. ही कारवाई अकोलालाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी केली. प्राप्त माहितीनुसार, बार्शीटाकळी तालुक्यातील काजळेश्वर गावातील एका ४२ वर्षीय व्यक्तीने आरोपी सहायक जिल्हा ग्रामउद्योग अधिकारी तथा प्रभारी जिल्हा ग्रामउद्योग अधिकारी विजय रामदास चाटी हा कर्जाबाबतचा अर्ज आॅनलाइन आणि स्कीमचा प्रोजेक्ट तयार करण्याकरिता अडीच हजार रुपयांची मागणी करत असल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिली होती. या तक्रारीची त्याच दिवशी पंचांसमक्ष पडताळणी केली असता तडजोडीअंती दोन हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. यावरून गुरुवारी दुपारी जिल्हा ग्रामउद्योग अधिकारी कार्यालयाच्या ठिकाणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून कारवाई केली. यावेळी तक्रारकर्त्याकडून दोन हजाराची लाच स्वीकारताना आरोपीला रंगेहात अटक करण्यात आली. याप्रकरणी आरोपी विजय रामदास चाटी याला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. ही कारवाई पोलीस निरीक्षक ईश्वर चव्हाण यांच्यासह सहकाºयांनी केली.