शहरं
Join us  
Trending Stories
1
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
2
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
3
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
4
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
5
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
6
KL Sharma : स्मृती इराणींच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसने उतरवलेले केएल शर्मा कोण आहेत?
7
RBI ने निर्बंध हटवले; Bajaj Finance च्या शेअर्समध्ये मोठी तेजी, ब्रोकरेजचा विश्वास वाढला
8
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
9
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
10
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
11
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
12
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
13
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
14
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
15
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
16
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
17
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
18
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
19
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
20
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!

गावात स्मशानभूमी नाही; चक्क पुलावर करावे लागले अंत्यसंस्कार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2020 10:06 AM

कुटुंबीयांनी अत्यंत जड अंत:करणाने गावातील नदीच्या पुलावर महिलेच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले.

ठळक मुद्देसंगीता अनिल पाटेकर हिला घरामध्ये सर्पदंश झाला.गावात अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमी, मोक्षधाम नाही.नदीच्या पुलावर महिलेच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले.

- प्रशांत विखे  लोकमत न्यूज नेटवर्कतेल्हारा : तालुक्यातील तळेगाव डवला येथे स्मशानभूमीच नसल्यामुळे गावातील मृतकांवर अंत्यसंस्कार करावे तरी कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. गावातील एका विवाहितेचा सर्पदंशाने मृत्यू झाला; परंतु गावात स्मशानभूमीच नसल्याने तिच्या कुटुंबीयांवर विवाहितेच्या पार्थिवावर चक्क गावातील पुलावरच अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली. त्यामुळे गावात लोकप्रतिनिधींविषयी रोष व्यक्त होत आहे.तळेगाव येथील २७ वर्षीय विवाहिता संगीता अनिल पाटेकर हिला घरामध्ये सर्पदंश झाला. महिलेला शेगाव येथे रुग्णालयात उपचारासाठी नेत असतानाच, गुरुवारी तिचा वाटेतच मृत्यू झाला. पाऊस, पाण्याचे दिवस. शेतांमध्ये पिकांची लागवड केलेली. चिखल साचलेला. गावात अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमी, मोक्षधाम नाही. अशा परिस्थितीत महिलेवर अंत्यसंस्कार करावेत तरी कुठे, असा प्रश्न महिलेचे कुटुंबीय, नातेवाइकांना पडला. अखेर गावालगतच्या पुलावरच अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला. १६ जुलै रोजी सायंकाळी संतप्त नातेवाईक, कुटुंबीयांनी अत्यंत जड अंत:करणाने गावातील नदीच्या पुलावर महिलेच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. हे अंत्यसंस्काराचे विदारक चित्र पाहून, रस्त्यावरील वाहनचालकसुद्धा अचंबित झाले होते. मरतानासुद्धा मरणे सोपे नाही. मरणानंतरही माणसाला यातना सहन कराव्या लागतात. याचेच उदाहरण गुरुवारी तळेगाव येथे पाहायला मिळाले. ग्रामपंचायत, लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे मृतकाला स्मशानभूमीसुद्धा नशीब होत नाही, यापेक्षा मोठे दुर्दैव ते कोणते?

दखल घेणार का?तळेगाव डवला गावात स्मशानभूमी नसल्यामुळे ग्रामस्थांना उघड्यावर, रस्त्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आता तरी लोकप्रतिनिधींनी जागे व्हावे आणि स्मशानभूमी, टिनशेडसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी यानिमित्ताने होत आहे. मृतक महिलेचा पती शेतमजूर असून, मृतक महिलेला दोन मुले आहेत. त्यांची गरिबीची परिस्थिती लक्षात घेऊन महिलेच्या कुटुंबाला आर्थिक मदतीची मागणी होत आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाTelharaतेल्हारा