शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
2
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
3
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
4
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
5
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
6
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
7
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
8
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
9
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
10
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
11
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
12
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
13
साताऱ्यात मेफेड्रॉन कारखाना उद्ध्वस्त; कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त, सात अटकेत
14
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
15
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
16
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
17
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
18
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
19
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
20
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्याच्या महापौरपदी भाजपचे विजय अग्रवाल

By admin | Updated: March 10, 2017 02:42 IST

उपमहापौरपदी वैशाली शेळके, काँग्रेसचा पराभव.

अकोला, दि. ९- अकोला महानगरपालीकेच्या महापौरपदी भारतीय जनता पक्षाचे विजय अग्रवाल तर उपमहापौरपदी वैशाली शेळके यांची निवड झाली. भाजप उमेदवारांनी कॉग्रेसच्या उमेदवारांचा पराभव केला. मनपाची स्थापना झाल्यापासून १६ वर्षांच्या कालावधीनंतर प्रथमच भाजपला एकहाती सत्ता मिळाली आहे. गुरुवारी मनपाच्या मुख्य सभागृहात महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली. भाजपचे विजय अग्रवाल यांना ८0 नगरसेवकांपैकी भाजपच्या ४९ नगरसेवकांची मते मिळाली. क ाँग्रेसचे उमेदवार शेख मोहम्मद नौशाद यांना काँग्रेसच्या १३ नगरसेवकांसह भारिप-बमसंच्या तीन व एक अपक्ष अशी एकूण १७ मते मिळाली. उपमहापौर पदासाठी भाजपच्या वैशाली विलास शेळके यांना ४९ मते मिळाली. काँग्रेसच्या सुवर्णरेखा जाधव यांना १७ मते प्राप्त झाली. या निवडणुकीत शिवसेनेच्या आठ नगरसेवकांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पाच व एमआयएमच्या एका नगरसेवकाने तटस्थ राहणे पसंत केले. उपमहापौर पदासाठी शिवसेनेच्यावतीने दोन उमेदवारी अर्ज सादर करण्यात आले होते. ऐनवेळी सेनेच्या दोन्ही उमेदवारांनी निवडणूक प्रक्रियेतून माघार घेतली. महापौर, उपमहापौर पदाची निवड प्रक्रिया दुपारी १२ वाजता आटोपल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी फटाके फोडून ढोल-ताशांच्या गजरात आनंद साजरा केला. दुपारी ४ वाजेपर्यंत पालिकेच्या आवारात जल्लोष सुरू होता. महापालिकेत 'विजय'पर्वराजकीय सारिपाटावर विजय अग्रवाल यांच्याकडे विविधांगी नजरेतून पाहिल्या जाते. १९८0 पासून पक्षात सक्रिय असलेल्या अग्रवाल यांनी आजवर अनेकांना आश्‍चर्याचे धक्के दिले. प्रशासनाचा गाढा अभ्यास व सर्वांना सोबत घेऊन चालणे ही त्यांची जमेची बाजू आहे. महापौर पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर महापालिकेत नवीन ह्यविजयह्णपर्वाला सुरुवात झाली आहे. अकोलेकरांनी भाजपला दिलेले स्पष्ट बहुमत पाहता विजय अग्रवाल व त्यांच्या सहकारी नगरसेवकांवर निश्‍चितच मोठी जबाबदारी आली आहे, हे येथे उल्लेखनीय.भाजपचे शक्तिप्रदर्शननिवडणुकीचा निकाल घोषित झाला त्याच दिवशी महापालिकेच्या सत्तेची चावी भाजपच्या हातामध्ये गेल्याचे स्पष्ट झाले होते. ८0 जागांपैकी ४८ जागांवर भाजपने विजय मिळवल्याने महापौर, उपमहापौर पदाच्या निवडणुकीची केवळ औपचारिकता बाकी होती. महापौर, उपमहापौर पदाची निवड प्रक्रिया दुपारी १२ वाजता आटोपल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी सभागृह दणाणून सोडले. फटाक्यांची आतषबाजी तसेच ढोल-ताशांच्या गजरात आनंद साजरा केला. सायंकाळी ५ वाजेपर्यंत पालिकेच्या आवारात जल्लोष सुरू होता. यावेळी भाजपचे खासदार, आमदार, पदाधिकारी, मंडळ अध्यक्षांसह कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.