शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

 vidhan sabha 2019 : युतीमध्ये शिवसेनेला अकोल्यातील एकच मतदारसंघ मिळण्याची शक्यता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 12:07 IST

आता या चार मतदारसंघांव्यतिरिक्त उरलेला एकमेव बाळापूर हाच मतदारसंघ सेनेला देण्याची शक्यता आहे.

- राजेश शेगोकार लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: विधानसभा निवडणुकीसाठीच्या मोर्चेबांधणीचे राजकारण आता वेगाने फिरू लागले आहे. भाजप-सेना युतीची बोलणी अंतिम टप्प्यात असून, युतीमध्ये सेनेला अकोल्यातील एकच मतदारसंघ मिळणार असल्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. सोमवारी मुंबईत भाजप पार्लमेंटरी बोर्डची बैठक होत आहे. या बैठकीत सेनेला कोणते मतदारसंघ सोडणार, याची चर्चा अपेक्षित असल्याने सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबईत धाव घेतली आहे.२०१४ च्या मोदी लाटेत भाजपाने अकोल्यात चार मतदारसंघ जिंकून सेनेला मागे टाकले. त्यामुळे आता या चार मतदारसंघांव्यतिरिक्त उरलेला एकमेव बाळापूर हाच मतदारसंघ सेनेला देण्याची शक्यता आहे. सेनेचा दोन मतदारसंघांवर दावा असून, मूर्तिजापूर मतदारसंघात सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भाजप आमदार हरीश पिंपळे यांच्याविरोधात बैठकांचे सत्र सुरू केले आहे. भाजपाचे पिंपळे पुन्हा आमदार नको, असा शिवसैनिकांचा आग्रह असल्याने या मतदारसंघाबाबतही युतीमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपच्या पार्लमेंटरी बोर्डच्या बैठकीत जागा वाटपाबाबत काय धोरण ठरते, याकडे भाजपसह शिवसैनिकांचेही लक्ष लागलेले आहे.दुसरीकडे याच मतदारसंघावर शिवसंग्रामचाही दावा कायम असल्याने भाजपसमोर हा मतदारसंघ कोणाला सोडावा, याचा मोठा प्रश्न राहणार आहे. युतीमध्ये मित्रपक्षांना अठराऐवजी दहा मतदारसंघ देण्याबाबत चर्चा सुरू असल्याने मित्रपक्षांच्या कमी झालेल्या मतदारसंघात पुन्हा बाळापूरचा बळी जातो का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

काँग्रेस-राष्ट्रवादीची आज पुन्हा बैठक; अकोला पश्चिम, बाळापूरवर चर्चा अपेक्षीतकाँग्रेस-राष्टÑवादी काँग्रेसच्या जागा वाटपामध्ये अकोला पश्चिम व बाळापूर विधानसभा मतदारसंघाचा गुंता सोमवारी होणाºया बैठकीत सुटण्याची चिन्हे आहेत. राष्टÑवादी काँग्रेसने या मतदारसंघावर दावा केल्यामुळे हा मतदारसंघ त्यांना देण्यात आला होता; मात्र काँग्रेसच्या इच्छुकांनी श्रेष्ठींकडे हा मतदारसंघ कायम ठेवण्याचा रेटा लावल्याने या मतदारसंघाबाबत सोमवारी पुन्हा चर्चा होणे अपेक्षित आहे. हा मतदारसंघ काँग्रेसला मिळाल्यास पुन्हा उमेदवारीसाठी स्पर्धा रंगणार असून, नाराजांच्या बंडखोरीचेही आव्हान पक्षासमोर कायम राहणार असल्याचे संकेत आहेत. दुसरीकडे अकोला पश्चिमवरील दावा सोडताना राष्टÑवादी काँग्रेस बाळापूरबाबत आग्रही राहण्याची शक्यता असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणAkolaअकोलाShiv SenaशिवसेनाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019balapur-acबालापूर