शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

vidhan sabha 2019 : चार मतदारसंघांत सात उमेदवारांचे नऊ अर्ज दाखल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 14:45 IST

अकोट, बाळापूर, अकोला पश्चिम व अकोला पूर्व या चार विधानसभा मतदारसंघांत सात उमेदवारांचे नऊ उमेदवारी अर्ज दाखल झाले.

अकोला : जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी १ आॅक्टोबर रोजी अकोट, बाळापूर, अकोला पश्चिम व अकोला पूर्व या चार विधानसभा मतदारसंघांत सात उमेदवारांचे नऊ उमेदवारी अर्ज दाखल झाले. मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही.जिल्ह्यातील अकोट, बाळापूर, अकोला पश्चिम, अकोला पूर्व व मूर्तिजापूर या पाच विधानसभा मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी २१ आॅक्टोबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे. त्यासाठी उमेदवारी अर्जांचे वाटप व उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया २७ सप्टेंबरपासून सुरू झाली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी (शुक्रवारी) बाळापूर विधानसभा मतदारसंघातून एक उमेदवारी अर्ज दाखल झाला होता. गत २८ व २९ सप्टेंबर रोजी दोन दिवसांच्या शासकीय सुटीनंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दुसºया दिवशी (३० सप्टेंबर रोजी) जिल्ह्यातील एकाही विधानसभा मतदारसंघात एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. त्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तिसºया दिवशी (१ आॅक्टोबर रोजी) अकोट, बाळापूर, अकोला पश्चिम व अकोला पूर्व या चार विधानसभा मतदारसंघांत सात उमेदवारांनी नऊ उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यामध्ये अकोट मतदारसंघात अपक्ष मधुसुदन गणगणे, विठ्ठल कोगदे, बाळापूर मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे आमदार बळीराम सिरस्कार, अपक्ष अश्वजित शिरसाट, तस्लीम शेख करीम शेख, अकोला पश्चिम मतदारसंघात अपक्ष रवींद्र मुंढे व अकोला पूर्व मतदारसंघात अपक्ष महेंद्र भोजने इत्यादी सात उमेदवारांचे नऊ उमेदवारी अर्ज दाखल झाले असून, मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातून एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ४ आॅक्टोबर असून, सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. 

 

टॅग्स :AkolaअकोलाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019