शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
5
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
6
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
7
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
8
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
9
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
10
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
11
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
12
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
13
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
14
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
15
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
16
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
17
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
18
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
19
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या

VIDEO : धान्य, फळे, भाजीपाला आता अल्पावधीतच वाळणार!

By admin | Updated: February 18, 2017 18:39 IST

  राजरत्न सिरसाट, ऑनलाइन लोकमत अकोला, दि. १८ -  सौर ऊर्जा वापरून धान्य, फळे तसेच भाजीपाला अल्पावधीतच वाळण्यासाठीचे तंत्रज्ञान ...

 
राजरत्न सिरसाट, ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. १८ -  सौर ऊर्जा वापरून धान्य, फळे तसेच भाजीपाला अल्पावधीतच वाळण्यासाठीचे तंत्रज्ञान डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विकसित केले आहे. हे ‘सोलर ड्रायर’ (सोलर शुष्कक) तंत्रज्ञान असून, वाळविताना भाजीपाला, फळांची गुणवत्ता कायम राहत असल्याने या तंत्रज्ञानाचा विस्तार करण्यात येत आहे.
देशात मुबलक सौर ऊर्जा उपलब्ध आहे. त्याचा उपयोग धान्य, फळे व भाजीपाला वाळविण्यासाठी करता येतो. सौर शुष्कक वापरल्यास पदार्थातील पोषण, तत्त्वे, चव, रंग आणि गुणवत्ता कायम राहते. तसेच कमीत, कमी वेळेत सुकवता, तर येतेच शिवाय जास्त काळ टिकवून ठेवता येत असल्याने या तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यात येत आहे. याकरिता कृषी विद्यापीठाने सोलर शुष्ककचे प्रात्यक्षिक शेतकर्‍यांना दाखविण्यात येत आहे.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या अपारंपरिक ऊर्जा स्रोत व विद्युत अभियांत्रिकी विभागाने अकोला येथे अर्धगोलाकार आकाराचे शुष्कक विकसित केले आहे. या सौर शुष्ककाची उत्पादन वाळविण्याची क्षमता १00 किलो एवढी आहे. यामध्ये औषधी वनस्पती, सफेद मुसळी, पानपिंपरी, हळद, मिरची, तसेच आवळा कॅन्डी, बटाटे चिप्स, हिरवा भाजीपाला इत्यादी वाळविण्यासाठी शुष्ककाचा वापर केल्यास पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत फायदेशीर आहे.
कृषी विद्यापीठात अर्ध दंडगोलाकार शुष्कक बनविण्यात आला असून, यावर पाईपचे सांगाडे लावले आहे. त्याला अल्ट्राव्हायलेट पॉलीथिलीन फिल्मने झाकली आहे. या शुष्ककामध्ये दिवसा हरितगृह परिणामामुळे आतील तापमानात वाढ होते. आतील तापमान हे वातावरणातील तापमानापेक्षा १५ ते २0डिग्री से. अधिक राहते.व दुपारी १२ ते २ या वेळेत ते ६0 ते ६५ डीग्री से. पर्यंत पोहोचते. जमिनीलगतचा पृष्ठभाग सिमेंट काँक्रीटचा बनवलेला आहे. त्यावर काळा रंग दिलेला आहे.  काळ्य़ा रंगाच्या गुणधर्मानुसार १00 टक्के उष्णता शोषून घेतली जाते. त्यामुळे जमिनीचे तापमान वाढते. शुष्ककातील वाढलेल्या तापमानामुळे व गरम हवेच्या प्रवाहामुळे धान्य, भाजीपाला तसेच फळे लवकर वाळण्यास मदत होते. या शुष्ककातील गरम हवा व अतिनील किरणामुळे पदार्थातील आद्र्रता कमी होऊन पदार्थ वाळतात. विशेष म्हणजे यावर पावसाचा तेवढा परणिाम होत नाही. गृहोद्योग, कृषी उद्योगाकरिता या तंत्रज्ञानाचा उत्तम फायदा होणार आहे.
पारंपरिक पद्धतीत पदार्थावर धूळ बसते, पक्षी, प्राण्यांची विष्ठा पडते व वाळण्यास बराच वेळ लागतो. म्हणूनच या तंत्रज्ञानाचा विस्तार करण्यात येत आहे.
- सोलर शुष्कक तंत्रज्ञान किफायतशीर असून, गृह, कृषी उद्योग उभारण्यासाठी फायदेशीर आहे. शेतकर्‍यांना हे तंत्रज्ञान बघण्यासाठी खुले आहे.
- डॉ. सुरेंद्र काळबांडे, संशोधन अभियंता, नवीकरणीय ऊर्जा स्रोत व विद्युत अभियांत्रिकी, डॉ. पंदेकृवि,अकोला.

 

https://www.dailymotion.com/video/x844req