शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

VIDEO- देशातील पहिला काँक्रिट पूल जीर्ण

By admin | Updated: September 26, 2016 15:17 IST

पूर्णा नदीवरचा देशातील पहिला काँक्रिट पूल ८९ वर्षे जुना असून, काळाच्या ओघात व नदीच्या पुराचे तडाखे सहन केल्याने हा पूल जीर्ण झाला

अतुल जयस्वाल/ ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. 26 - जिल्ह्यातील गांधीग्राम येथील पुर्णा नदीवरचा देशातील पहिला ‘काँक्रिट’ पूल ८९ वर्षे जुना असून, काळाच्या ओघात व नदीच्या पुराचे तडाखे सहन केल्याने हा पूल जीर्ण झाला आहे. अकोला ते आकोट मार्गावर असलेल्या या पुलावरून दररोज शेकडो वाहने जात असल्याने या पुलावर मोठा भार असतो. हा पूल मुदतबाह्य झाला असून, पुलाला आधार देणा-या गावाकडच्या दिशेला असलेल्या भरावाला खिंडार पडले आहे. यामुळे हा पूल कमकुवत झाला असून, एखाद्या दिवशी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 
मध्य प्रदेशातील हरिसाल व आंध्र प्रदेशातील हैदराबाद या दोन शहरांना जोडणारा मार्ग अकोला जिल्ह्यातून जातो. आकोट ते अकोलादरम्यान असलेल्या गांधीग्राम येथून वाहणा-या पूर्णा नदीवर तत्कालीन ब्रिटीश सरकारच्या अमदानीत बांधण्यात आलेल्या पुलाचे उद्घाटन १८ जुलै १९२७ रोजी मॉटेंग्यू बटलर या ब्रिटीश अधिकाºयाच्या हस्ते करण्यात आले होते. तेव्हापासून आजतागायत हा पूल पुर्णा नदीत उभा आहे. या पुलाची उंची सहा मीटर असून, त्याला १५ मीटरचे आठ गाळे आहेत. तब्बल ९० वर्षांचे वय झालेल्या या पुलावरून दररोज हजारो वाहने ये-जा करतात. उत्तर व दक्षिण भारताला जोडणारा जवळचा दुवा असलेला हा पूल आता मुदतबाह्य झाला आहे. या पुलाची उंची कमी असल्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात पूर्णा नदीला आलेल्या पुराचे पाणी पुलावरून वाहते. सलग दोन ते तीन दिवस या पुलावर १५ ते २० फूट पाणी असते. एवढ्या वर्षांपासून पुराचे तडाखे सहन केलेला हा पूल कवकुवत झाला आहे.  या पुलाची मुदतही संपली आहे. त्यामुळे गांधीग्राम येथून जवळच असलेल्या गोपालखेड या गावानजीक पुर्णा नदीवर पूल बांधण्यात येत आहे. सदर पुलाचे काम पूर्णत्वास जात असले, तरी अजून किमान वर्षभर तरी त्यावरून वाहतूक सुरू होऊ शकत नाही.
 
२५० पेक्षाही अधिक पुराचे तडाखे
या पुलाच्या निर्मितीला ८९ वर्षे पुर्ण झाली आहेत. निर्मितीपासून आतापर्यंत या पुलाने २५० पेक्षाही अधिक पुराचे तडाखे सहन केले आहेत. दरवर्षी पावसाळ्यात पुर्णा नदीला दोन ते तीन मोठे पुर येतात. पुराचे पाणी दोन-दोन दिवस पुलावरून वाहते. पुराचे एवढे तडाखे सहन केल्यामुळे हा पुल आता जिर्ण झाला आहे.