शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भाचा पैसा पश्चिम महाराष्ट्रा कडे वळता; दूध महासंघाची देयके रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 12:50 IST

अकोला : विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दूध महासंघाची देयके देण्यात आलेला कोट्यवधी रुपयांचा निधी पश्चिम महाराष्ट्रा कडे वळता करण्यात आल्याने येथील दूध महासंघाची देयके रखडली आहेत.

अकोला : विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दूध महासंघाची देयके देण्यात आलेला कोट्यवधी रुपयांचा निधी पश्चिम महाराष्ट्रा कडे वळता करण्यात आल्याने येथील दूध महासंघाची देयके रखडली आहेत. अकोल्यात आता आपातकालीन निधी पाठविण्यात आल्याने यातून काही देयके अदा करण्याची वेळ शासकीय दूध योजनेवर आली आहे.पश्चिम महाराष्ट्रा तील काही दूध महासंघ, दूध उत्पादक शेतकरी प्रतिलिटर २० रुपये प्रमाणे दुधाची विक्री करतात. तथापि, हे दर परवडणारे नसल्याने तेथील दूध महासंघ, दूध उत्पादकांनी आंदोलन केली होती; त्यामुळे शासनाने प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आणि त्याची अंमलबजावणीदेखील केली. तथापि, निधीच उपलब्ध नसल्याने शासनाने त्यासाठी विदर्भाला मिळालेल्या वार्षिक तरतुदीतील पैसा पश्चिम महाराष्ट्रा कडे वळता केला. अकोला-वाशिम जिल्ह्यातील जवळपास दोन कोटीच्यावर ही रक्कम असल्याचे वृत्त आहे. याचा परिणाम मात्र येथील दूध महासंघ, दूध उत्पादकांवर झाला. दूध उत्पादकांची देयके देण्यासाठी शासकीय दूध योजनेकडे पैसाच उपलब्ध नसल्याने मागील नोव्हेंबर माहिन्याची देयके रखडली. परिणामी, दूध उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडल्याने शासकीय आकस्मिक निधी देण्याची वेळ आली आहे.दरम्यान, देयके थकल्याने अकोला व वाशिम जिल्ह्यासाठी आता १४ लाख रुपयांचा आकस्मिक योजनेतील निधी देयात आला आहे. अकोला- वाशिम जिल्ह्यात जवळपास ३० च्यावर दूध उत्पादक संस्था आहेत. या संस्था जिल्हा दूध संघाच्या महासंघाला दुधाचा पुरवठा करतात. महासंघ शासकीय दूध योजनेला दुधाचा पुरवठा करतो. म्हणूनच देयकांची जबाबदारी महासंघाची असते. आता आकस्मिक निधीतून सोमवारी आठ लाख रुपये देयकापोटी देण्यात आले असून, आणखी साडेपाच लाख रुपये वाटप करणे बाकी आहे.

 

आकस्मिक १४ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला असून, अकोला-वाशिम जिल्ह्यातील दूध उत्पादकांची थकलेली रक्कम दूध महासंघाला जवळपास आठ लाख रुपयांची रक्कम देण्यात आली आहे. उर्वरित रक्कम मंगळवारी देण्यात येणार आहे; तसेच नवीन निधीदेखील लवकरच येणार आहे.एस.आर.धर्माळे,प्रभारी दुग्ध शाळा व्यवस्थापक,शासकीय दूध योजना, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाVidarbhaविदर्भ