अकोला: राज्यात सर्वत्र जोरदार पर्जन्यवृष्टी होत असून, विदर्भातही मागील चोवीस तासात बर्याच ठिकाणी पाऊस सुरू आहे. येत्या चोवीस तासात ३ ऑगस्ट रोजी कोकण-गोव्यासह विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागने वर्तविली आहे. दरम्यान, मागील चोवीस तासात विदर्भातील ५0 ठिकाणी कमी-अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली आहे. विदर्भातील गोंदिया येथे २१.२ तर बुलडाणा येथे २१ से.मी. सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आली. उत्तर बंगालचा उपसागर व लगतच्या भागावर असलेले कमी दाबाचे क्षेत्र आता वायव्य बंगालच्या उपसागराच्या पश्चिम बंगाल, उत्तर ओडिशा किनारपट्टीवर आहे. दरम्यान, येत्या चोवीस तासात ३ ऑगस्ट रोजी व ६ ऑगस्ट रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मागील चोवीस तासात विदर्भातील पाऊस मि.मी.मध्ये अकोला - १0.६ अमरावती -00 बुलडाणा - २१.00 ब्रह्मपुरी - 0८.0 चंद्रपूर -१६.६ गोंदिया -२१.२ नागपूर-0.३ वाशिम-१0.0 वर्धा -0२.२ यवतमाळ-0३.६
विदर्भात आज मुसळधार पाऊस!
By admin | Updated: August 3, 2016 02:23 IST