शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

विकास हवा असेल तर विदर्भ राज्याची निर्मिती आवश्यक - आमदार आशीष देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 01:54 IST

अकोट : विदर्भाची सद्यस्थिती, सिंचनाचा अनुशेष, शेतकर्‍यांचे प्रश्न, शेतकर्‍यांच्या आत्महत्या, बेरोजगारी, वीज भारनियमन, कुपोषण, नक्षलवाद आदी समस्या दूर करून विदर्भाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी विदर्भ राज्याची निर्मिती आवश्यक असल्याचे प्रतिपादन आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी केले.

ठळक मुद्देआत्मबळ यात्रेत अकोटमध्ये आमदार आशीष देशमुख यांचे प्रतिपादन

लोकमत न्यूज नेटवर्कअकोट : विदर्भाची सद्यस्थिती, सिंचनाचा अनुशेष, शेतकर्‍यांचे प्रश्न, शेतकर्‍यांच्या आत्महत्या, बेरोजगारी, वीज भारनियमन, कुपोषण, नक्षलवाद आदी समस्या दूर करून विदर्भाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी विदर्भ राज्याची निर्मिती आवश्यक असल्याचे प्रतिपादन आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी केले.काटोलचे आमदार डॉ. आशिष देशमुख यांची आत्मबळ यात्रा १६ जानेवारी रोजी अकोट शहरात पोहोचली. स्थानिक राजमंगल सभागृहात आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी उपस्थितांशी व पत्रकारांशी संवाद साधला. ते पुढे म्हणाले, की राज्यातील भाजप नेतृत्वातील सरकार सत्तेवर येऊन तीन वर्षे उलटली, तरी वर्‍हाड प्रांतातील अनेक कामे रखडलेली आहेत. फक्त अकोला जिल्ह्याचा विचार केला, तर शेतकरी कशीबशी शेती करीत आहेत. त्यांच्या पाठीशी सरकार उभे असल्याचे दिसत नाही. खारपाणपट्टय़ाचा प्रश्न तसाच आहे. अकोला जिल्ह्यात रोजगार निर्मितीसाठी कोणतेच प्रयत्न होताना दिसत नाहीत. अनेक उद्योगधंदे बंद पडत आहेत. जिल्हा कापूस उत्पादक असला, तरी जिल्ह्यातील दोन्ही सूतगिरण्या बंद आहेत. जिल्हय़ात प्रक्रिया उद्योग नाहीत. हे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मिती होणे आवश्यक असल्याचे सांगून विदर्भ राज्यासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्रित येऊन विदर्भ आत्मबळ यात्रा यशस्वी करावी, असे आवाहन आमदार डॉ. देशमुख यांनी केले. अकोट येथील सभेनंतर ही यात्रा मुंडगाव येथे पोहोचली. येथेसुद्धा आमदार डॉ. देशमुख यांनी जनतेशी संवाद साधला.

वेगळ्या विदर्भाची मागणी करताच पक्षाची नोटीस भाजपाने वेगळ्या विदर्भ राज्याचा ठराव घेतला होता. अशासकीय ठराव यापूर्वी अनेक वेळा मांडण्यात आलेत; मात्र अद्याप हालचाली नाहीत. त्यामुळे विदर्भ राज्याचा मुद्दा उपस्थित केल्याने पक्षाची नोटीस मिळाल्याची खंत यावेळी डॉ. देशमुख यांनी बोलून दाखविली. नोटीसचे उत्तर हे जनतेशी चर्चा करूनच देणार असल्याचे ते म्हणाले. 

टॅग्स :akotअकोट