शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भ राज्य आंदोलन समिती लढविणार विदर्भातील सर्व जागा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 12:27 IST

विदर्भातील लोकसभेच्या तसेच विधानसभेच्या सर्व जागा लढविणार असल्याची माहिती विदर्भ राज्य समितीचे नेते माजी आमदार वामनराव चटप यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत दिली.

अकोला : विदर्भ राज्याची मागणी सातत्याने होत आहे. या मागणीची दखल काँग्रेस व भाजपा या दोन्ही पक्षांच्या सरकारांनी घेतली नाही. आश्वासन देऊनही विदर्भ राज्य निर्मिती पूर्ण होऊ शकली नाही; मात्र आम्ही हिंमत हारली नसून, विदर्भ राज्य देता की जाता, असा सवाल भाजप सरकारला करणार असून, विदर्भातील लोकसभेच्या तसेच विधानसभेच्या सर्व जागा लढविणार असल्याची माहिती विदर्भ राज्य समितीचे नेते माजी आमदार वामनराव चटप यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत दिली.विदर्भ राज्य आंदोलन समितीने अनेक वर्षांपासून विदर्भ राज्याची मागणी आतापर्यंत सत्तेत आलेल्या सरकारला केली होती. तसे आश्वासनही निवडणुकीपूर्वी देण्यात आले; मात्र सत्ता हाती येत गेली, मागणी रेंगाळत गेली; परंतु आता सरकारला धडा शिकविण्याशिवाय पर्याय नाही. विदर्भ राज्य हवे असेल, तर मैदानात उतरावेच लागेल, असा निर्धार करीत विदर्भ राज्य आंदोलन समितीने २ जानेवारीपासून नागपूर येथून विदर्भ राज्य निर्माण यात्रेला प्रारंभ केला आहे. ही यात्रा शुक्रवारी पोहोचली असता, पत्रकार भवन येथे संवाद साधला. ही यात्रा १२ जानेवारीपर्यंत विदर्भात फिरणार असून, नागपूर येथे समारोप होईल. यामध्ये भाजप सरकारला आठ प्रश्नांची उत्तर मागितले जाणार आहे.स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती केव्हा करणार, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती केव्हा करणार, उत्पादन खर्चासह ५० टक्के नफा मिळण्याच्या हिशेबाने शेतमालाला भाव देण्याची घोषणा कधी करणार, ग्रामीण भागातील लोडशेडिंग केव्हा संपविणार, सर्व वैदर्भीय जनतेसाठी विजेचे दर निम्मे केव्हा करणार, शेती पंपाचे विजेचे देयक केव्हा संपणार, अल्प बचत गटावरील मायक्रो फायनान्स कर्ज केव्हा संपविणार, दोन कोटी तरुणांना दरवर्षी नोकºया केव्हा देणार, या मागण्यांचा समावेश राहील. पत्रपरिषदेला सुरेश जोगळे, माधवराव गावंडे, घनश्याम पुरोहित, रंजना मामर्डे, ललित बहाळे, सतीश देशमुख, अविनाश नाकट, डॉ. नीलेश पाटील व धनंजय मिश्रा उपस्थित होते.

 

टॅग्स :AkolaअकोलाWamanrao Chatapवामनराव चटपPoliticsराजकारण