अकोला : गत सहा दिवसांपासून राज्यात बर्याच ठिकाणी गारपीटसह पाऊस बरसला असून, येत्या १७ एप्रिलपर्यंत विदर्भात पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. गत सहा दिवसांपासून सुरू असलेल्या या पावसामुळे फळे, भाजीपाला, दादर, शाळू ज्वारीचे मोठे नुकसान झाले असून, शेडनेटला फटका बसला आहे. पश्चिम विदर्भात अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ व अमरावती जिल्हय़ाच्या काही भागात सहा दिवसांपासून मेघ गर्जनेसह गारांचा पाऊस पडल्याने या भागातील जनजीवन विस्कळीत झाले. वातावरणात गारवा निर्माण झाल्याने वयोवृद्ध, बालकांच्या आजारात वाढ झाली आहे. या पूर्वमोसमी पावसामुळे राज्यातील हवामान बदलले असून, मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट झाली असून, येत्या १७ एप्रिलपर्यंत राज्यात पावसाची शक्यता असल्याने शेतकरी धास्तावले आहेत.
विदर्भात शुक्रवारपर्यंत पावसाची शक्यता !
By admin | Updated: April 16, 2015 00:35 IST