शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
2
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
3
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
4
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
5
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
6
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
7
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
8
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
9
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
10
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
11
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
12
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!
13
उलटेच झाले! सामुहिक बलात्काराची केस दाखल केली, तिलाच सात वर्षांची शिक्षा झाली
14
PF साठी एजंट्सची मदत घेताय? सावधान! EPFO ने दिली धोक्याची घंटा, पैसे आणि डेटा दोन्ही जाईल!
15
स्वामी विवेकानंदांनी सांगितलेली 'ही' तीन ध्येय साध्य केली तर आपला पराभव होऊच शकणार नाही!
16
'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'चा सीक्वेल येणार? काजोल म्हणाली, "सिनेमाचा जो शेवट झाला..."
17
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
18
Crude Oil Reserves India : भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
19
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले

विदर्भात आता व्यावसायिक, शास्त्रोक्त कुक्कुटपालन !

By admin | Updated: March 11, 2016 02:48 IST

राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून एक कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार.

अकोला: कुक्कुटपालन व्यवसायाला चालना देण्यासाठी आता व्यावसायिक, शास्त्रोक्त पद्धतीने कोंबडीपालन कार्यक्रम राबविण्यावर शासनाने लक्ष केंद्रित केले असून, विदर्भातील शेतकर्‍यांना कमी खर्चात जास्त उत्पादन मिळवता यावे, यासाठीचे कुक्कुटपालनाचे अर्थशास्त्र व तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. या प्रशिक्षणावर राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून एक कोटी रुपयांचा खर्च करण्यात येत आहे. कुक्कुटपालन व्यवसायाला चांगला वाव असून, कमी खर्चात चांगले उत्पन्न देणार्‍या या व्यवसायाचा ग्रामीण भागात प्रसार करण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत. अनेक ठिकाणी पारंपरिक पद्धतीने कोंबडीपालन केले जात आहे. म्हणूनच व्यावसायिक पद्धतीने कुक्कटपालनावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. कुक्कुटपालन करताना अनेक प्रकारची काळजी घ्यावी लागते. यामध्ये लहान पिल्लांचे संगोपन हे अत्यंत महत्त्वाचे आहे. कोंबड्याना होणारे आजार, त्यावरील उपचार, लसीकरण, कोंबड्यांना लागणारे खाद्य व त्याची निर्मिती अशा अनेक बाबी महत्त्वाच्या आहेत. आपल्याकडे मात्र व्यवसाय म्हणून कोंबडीपालन केले जात नसल्याने या सर्व बाबींकडे दुर्लक्ष केले जाते; तथापि शेतीला हा अत्यंत पूरक व्यवसाय असल्याने तो वृद्धिंगत होणे गरजेचे असल्याने पशुसंवर्धन आयुक्त कार्यालयामार्फत शेतकर्‍यांना शास्त्रोक्त कुक्कुटपालन प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम तयार करण्यात आला असून, स्नातकोत्तर पशुवैद्यकीय व पशुविज्ञान संस्थेचे शास्त्रज्ञ शेतकर्‍यांना प्रशिक्षण देत आहेत. आतापर्यंत ५00 शेतकर्‍यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. ८ मार्च रोजी एका तुकडीचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून, १४ मार्च रोजी दुसरे प्रशिक्षण सुरू होत आहे.पश्‍चिम विदर्भातील खारपाणपट्टय़ातील अतिशय अल्कधर्मी व खार्‍या पाण्यामुळे या भागातील पशुधन आणि कोंबड्यांना गंभीर स्वरू पाचे आजार होत असल्याचे प्राथमिक संशोधनातून पुढे आले आहे. या सर्व परिस्थितीची माहिती शेतकर्‍यांना मिळाल्यास या भागात कुक्कुटपालन व्यवसाय वाढून शेतकर्‍यांना चांगले उत्पन्न मिळवता येईल. यासाठीच या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत एक कोटी रुपये शासनाने स्नातकोत्तर पशुवैद्यकीय, पशुविज्ञान संस्थेला दिले आहेत.