शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भातील नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालयांचे काम र खडले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 01:49 IST

अकोला : विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी शासनाने दोन वर्षांपूर्वी  खान्देशातील जळगाव आणि विदर्भातील अकोला येथे  पशुवैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी दिली आहे. यावर्षी  अकोला येथे विद्यार्थ्यांना प्रवेश देणे अपेक्षित होते.  त्यासाठीचे संसाधने येथे उपलब्ध होती; परंतु नवीन इमारत  उभारण्याचा घाट घातला जात असून, त्या इमारतीवर जवळ पास ३00 कोटी खर्च करण्यात येणार आहे. इमारत उभी  राहण्यासाठी किती वर्ष लागतात, हा देखील प्रश्न निर्माण  झाला आहे.

ठळक मुद्देसंसाधने असताना ३00 कोटींचा घाट!नवीन जागेत बांधणार महाविद्यालय

राजरत्न सिरसाट । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी शासनाने दोन वर्षांपूर्वी  खान्देशातील जळगाव आणि विदर्भातील अकोला येथे  पशुवैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी दिली आहे. यावर्षी  अकोला येथे विद्यार्थ्यांना प्रवेश देणे अपेक्षित होते.  त्यासाठीचे संसाधने येथे उपलब्ध होती; परंतु नवीन इमारत  उभारण्याचा घाट घातला जात असून, त्या इमारतीवर जवळ पास ३00 कोटी खर्च करण्यात येणार आहे. इमारत उभी  राहण्यासाठी किती वर्ष लागतात, हा देखील प्रश्न निर्माण  झाला आहे.अकोला व जळगावला राज्य शासनाने पशुवैद्यकीय  महाविद्यालय मंजूर केले आहे. महाविद्यालयाची इमारत,  प्रयोगशाळेसाठी महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाला  दहा कोटी रुपये निधी दिला आहे. वर्‍हाडातील अर्थव्यवस्था  कृषी क्षेत्रावर अवलंबून असल्याने त्या दृष्टीने मागील दोन  वर्षांपूर्वी अर्थसंकल्पात हा विचार करू न विद्यार्थ्यांना प्रवेश  घेण्यासाठी अकोला व जळगाव खान्देश येथे महाविद्यालय  मंजूर केले आहे.  व्हेटरनरी कौन्सिल ऑफ इंडियाच्या निकषानुसार,  महाविद्यालयाला जागा हवी आहे. अकोल्यात स्नातकोत्तर  पशुवैद्यक व विज्ञान संस्थेची जागा आहे, तेथे एमएससी ते  पीएचडीपर्यंतचा अभ्यासक्रम आहे. बीएससी व्हेटरनरीच्या  प्रथम वर्षाला ६0 विद्यार्थी प्रवेश क्षमता राहील. सध्या स्ना तकोत्तर पशुवैद्यक व विज्ञान संस्थेची  जागा उपलब्ध असून,  प्रयोगशाळा उपलब्ध आहे. कर्मचारी, शास्त्रज्ञ तसेच  अधिकारी वर्गही आहे. केवळ दोन विभाग सुरू  करावे लाग तील, असे असताना येथे अद्याप प्रवेश  प्रक्रिया सुरू  केली  नाही. महाराष्ट्र पशू  विज्ञान विद्यापीठाचे नवृत्त कुलगुरू  डॉ.  आदित्यकुमार मिश्रा यांनी त्यांच्या कार्यकाळात नवीन इमार तीचा हट्ट धरल्याने यावर्षी प्रवेश प्रक्रिया सुरू  झाली  नसल्याचे वृत्त आहे.

नवीन जागेत बांधणार महाविद्यालयसर्व संसाधने उपलब्ध असताना वाशिम रोडवरील कृषी  विद्यापीठाच्या जागेत हे महाविद्यालय बांधण्याचा घाट घा तल्या जात आहे. त्यासाठी ही जागा निश्‍चित करण्यात आली  आहे. या इमारतीवर २१0 ते ३00 कोटी रुपये खर्च अपेक्षित  आहे. या इमारतीच्या बांधकामाला जवळपास ४ ते ५ वर्षांचा  वेळ लागण्याची शक्यता असल्याने संसाधने असूनही प्रवेश  रखडला आहे.

स्नातकोत्तर पशुवैद्यक व विज्ञान संस्थेची जागा उपलब्ध पदवी अभ्यासक्रम पाच वर्षांचा असल्याने ३00 विद्यार्थी येथे  असतील. उर्वरित स्नातकोत्तर अभ्यासक्रमाचे १२0 विद्यार्थी  म्हणजेच जवळपास ५00 विद्यार्थी येथे शिक्षण घेणार आहेत.  त्यासाठीची जागा स्नातकोत्तर पशुवैद्यक व विज्ञान संस्थेची  आहे. यामध्ये काही जागा घ्यावी लागेल. त्यासाठीची कृषी  विद्यापीठाची जागाही उपलब्ध आहे. असे असताना नवीन  इमारतीचा घाट घातला जात आहे.

इमारत बांधून झाल्यावर लवकरच पशू वैद्यकीय पदवी  महाविद्यालय सुरू  होणार आहे. त्यासाठी प्रयत्न सुरू  आहेत.डॉ. हेंमत बिराडे, अधिष्ठाता,स्नातकोत्तर पशुवैद्यक व विज्ञान संस्था, अकोला.