शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

विदर्भात २६ हजार रुग्णांच्या दिमतीला ‘१0८’ !

By admin | Updated: November 12, 2014 00:07 IST

आपत्कालीन रुग्णवाहिकेला रुग्णांचा उदंड प्रतिसाद.

ब्रम्हानंद जाधव/मेहकर(बुलडाणा)आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ वैद्यकीय सेवा पुरविण्याकरीता राज्य सरकारने सुरू केलेल्या अत्याधुनिक १0८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेला विदर्भात उदंड प्रतिसाद लाभत असून, आपत्कालीन रुग्णवाहिका कार्यरत झाल्यापासून आतापर्यंत विदर्भातील तब्बल २६ हजार २७२ रुग्णांच्या दिमतीला, ही रुग्णवाहिका धावली आहे. आपत्कालीन परिस्थितीत तातडीने वैद्यकीय सेवा पुरविण्याकरीता, राज्य सरकारने राज्यभर आपत्कालीन वैद्यकीय सेवा अंतर्गत अत्याधुनिक रुग्णवाहिका सेवा सुरू केली आहे. ही सेवा २६ जानेवारी २0१४ पासून सुरू झाली आहे. या उपक्रमातील रुग्णवाहिका जागतिक दर्जाच्या आहेत. आपत्कालीन परिस्थितीत १0८ क्रमांक फिरविल्यास अवघ्या २0 ते ३0 मिनिटात सुसज्ज रुग्णवाहिका घटनास्थळी उपलब्ध होते. सध्या राज्यभर १0८ क्रमांकाच्या ९३७ रुग्णवाहिका धावत आहेत. दिवसाचे २४ तास सेवा पुरवित असलेल्या या रुग्णवाहिकांसाठी दोन पाळ्यांमध्ये कर्मचारी आहेत. विदर्भात आतापर्यंत २६ हजार २७२ रुग्णांनी या आपत्कालीन रुग्णवाहिकेचा लाभ घेतला आहे. विदर्भातील अकोला जिल्ह्यात २,१७७, अमरावतीमध्ये ४,६६९, भंडार्‍यात १,३५0, बुलडाण्यात २९७0, वाशिममध्ये १,३४२, यवतमाळमध्ये ३,७३३, चंद्रपुरात १,६१३, गडचिरोलीत ५८४, गोंदीयामध्ये २,0४८, नागपुरात ४,९0७, तर वर्धा जिल्ह्यात ८७९ रुग्णांनी या आपत्कालीन रुग्णसेवेचा लाभ घेतला आहे. आपत्कालीन स्थितीमध्ये ही रुग्णवाहीका रुग्णांच्या सेवेसाठी मोफत हजर होत असल्याने, गोरगरीब रुग्णांसाठी १0८ हा दूरध्वनी क्रमांक एकप्रकारे जीवनदायीच ठरत आहे.