अकोला: कौलखेड येथे शुक्रवारपासून सुरू झालेल्या ४२ व्या राज्यस्तरीय ज्युनिअर कबड्डी अजिंक्यपद स्पर्धे त उशिरा रात्री झालेल्या सामन्यांमध्ये अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली संघाने विजय मिळविला. उद्घाटनीय सामन्यात अमरावती संघाने गडचिरोली संघावर २७ गुणांनी विजय मिळवून स्पर्धेला विजयी सलामी दिली.मुलांच्या गटातील पहिला सामना अमरावती व गडचिरोली संघात झाला. यामध्ये अमरावती संघाने ४६ गुण, तर गडचिरोली संघाने १९ गुण मिळविले. दुसरा सामना चंद्रपूर व बुलडाणा जिल्हा संघात झाला. चंद्रपूर संघाने ३७-२१ असा सामना जिंकला. मुलींच्या गटातील पहिला सामना गडचिरोली व वर्धा संघात झाला. गडचिरोली संघाने २९-२४ असा विजय मिळविला. दुसरा सामना भंडारा व चंद्रपूर संघात घेण्यात आला. भंडारा संघाने २१ आणि चंद्रपूर संघाने २३ गुण मिळविले. चंद्रपूर संघाने २ गुणांची आघाडी घेऊन सामना जिंकला. स्पर्धा यशस्वितेसाठी गणेश पावसाळे, मंगेश काळे, युवराज गावंडे, सुभाष तायडे, अंबादास नागे, प्रशांत गावंडे, संजय मैंद, उमाकांत कवडे, नकुल ताथोड, संजय सुकडे, गजानन डोईफोडे, सतीश डफाडे, केदार खरे, संजय झाडोकार, राजू दहापुते, किशोर राजूरकर, भाऊराव मेश्राम, डॉ. राजकुमार बुले, विजय खुमकर, गणेश राऊत आदी प्रयत्नशील आहेत.