अकोला : रखरखत्या उन्हाची तीव्रता अकोलेकरांना चांगलीच जाणवत आहे. शहरातील इसमाला उन्हाचा फटका बसल्याने त्याला गुरुवारी सायंकाळी सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. शुक्रवारी सकाळी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शहरातील भीमराव सावळे (५५) नामक इसमास उन्हाचा फटका बसल्याने त्याला गुरुवारी सायंकाळी ६ वाजतादरम्यान सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. शुक्रवारी सकाळी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ऊन लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली
उष्माघाताने एकाचा बळी
By admin | Updated: June 7, 2014 00:37 IST