शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
3
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
4
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
5
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
6
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
7
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
8
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
9
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
10
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
11
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
12
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
13
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
14
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
15
तुळजाभवानी मंदिरात देणगी दर्शन पासच्या शुल्कात दुप्पट वाढ, मात्र अभिषेकाची संख्या वाढवली
16
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
17
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
18
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
19
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
20
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!

दिग्गजांची एन्ट्री, प्रस्थापितांची कसोटी!

By admin | Updated: September 28, 2014 01:59 IST

अकोला जिल्ह्यातील विद्यमान आमदारांपुढे आव्हान; नेत्यांची नवीन पिढी रिंगणात.

मनोज भिवगडे / अकोला

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शनिवार हा शेवटचा दिवस. जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघात १८५ उमेदवारांनी २५८ अर्ज दाखल केले. युती आणि आघाडी तुटल्याने जिल्ह्यातील दिग्गजांना निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची संधी मिळाली. दिग्गजांच्या एंट्रीने प्रस्था िपतांपुढे आव्हान उभे झाले असून, सर्वच पक्ष स्वतंत्र लढत असल्याने नेत्यांची नवीन पिढीही निवडणुकीच्या मैदानात उतरली आहे. अकोला जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांपैकी २ भाजप आणि २ भारिप-बमसंच्या तर एक मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात आहे. २00९ च्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप एकत्र लढले होते. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार रिंगणात होते. यावेळी मात्र युती आणि आघाडीतील सर्वच पक्ष स्वतंत्र लढत आहेत. काँग्रेस, राकाँ, शिवसेना आणि भाजपने स्वतंत्र उमेदवार दिले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत जागा वाटपामुळे ज्या पक्षांच्या नेत्यांना संधी मिळत नव्हती, त्यांनाही यावेळी निवडणुकीच्या रिंगणात उतरता आले. अकोला पश्‍चिममधून २0 वर्षांपासून आमदार असलेले भाजपचे गोवर्धन शर्मा यांच्याविरोधात शिवसेनेचे दिग्गज नेते गुलाबराव गावंडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याशिवाय राकाँकडून विजय देशमुख आणि काँग्रेसकडून उषा विरक यांना उमेदवारी मिळाली आहे. अकोला पूर्वमधून भारिपचे हरिदास भदे दहा वर्षांंपासून आमदार आहेत. त्यांना पक्षाने तिसर्‍यांदा उमेदवारी दिली आहे. यावेळी मात्र त्यांच्यापुढे आमदार गो पीकिसन बाजोरिया यांच्यासह राकाँचे शिरिष धोत्रे आणि काँग्रेसचे डॉ. सुभाष कोरपे यांच्यासह अ पक्ष विजय मालोकार आणि डॉ. पुरुषोत्तम दातकर यांचे आव्हान राहणार आहे. बाजोरिया आणि मालोकार या दिग्गजांसोबतच शिरिष धोत्रे आणि सुभाष कोरपे, दातकर हे दुसर्‍या फळीतील नेते प्र थमच निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. आकोटमधून आमदार संजय गावंडे यांना पुन्हा उमेदवारी मिळाली आहे. त्यांच्यापुढे भाजपचे दिग्गज प्रकाश भारसाकळे यांचे आव्हान आहे. राकाँचे राजू बोचे आणि काँग्रेसचे नव्या पिढीतील नेते महेश गणगणे यांनीही विद्यमान आमदाराविरुद्ध दंड थोपटले आहेत. बाळापूरमध्ये भाजपचा गोंधळ सुरूच आहे. एबी फॉर्म देतानाही जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात यांच्यासह शिवसंग्रामचे संदीप पाटील या दोघांचेही नाव टाकण्यात आले. त्यामुळे नेमका भाजपचा उमेदवार कोण, याबाबतचा संभ्रम अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतरही कायम होता. येथून विद्यमान आमदार बळीराम सिरस्कार यांच्याविरुद्ध काँग्रेसतर्फे नतिकोद्दिन खतीब यांना रिंगणात उतरविण्यात आले. काँग्रेसची तिकीट न मिळाल्याने नाराज झालेले माजी आमदार नारायण गव्हाणकर यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली तर माळी समाजातील प्रकाश लक्ष्मणराव तायडे यांना काँग्रेससोबतच राकाँची उमेदवारीही मिळाली नाही. त्यामुळे त्यांना अपक्ष म्हणून अखेर उमेदवारी अर्ज दाखल करावा लागला. मूर्तिजापूर मतदारसंघात विद्यमान हरीश पिंपळे यांना भाजपने पुन्हा रिंगणात उतरविले. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघातून काँग्रेसने माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रावण इंगळे यांना उमेदवारी दिली आहे.