शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
2
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
3
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
4
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
5
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
6
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
7
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
8
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
9
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
10
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
11
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
12
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
13
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
14
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
15
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
16
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
17
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
18
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
19
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
20
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय

कर्जमाफीच्या अर्जांची   उद्यापासून पडताळणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 01:41 IST

अकोला : कर्जमाफी योजनेंतर्गत १५ सप्टेंबरपर्यंत जिल्हय़ातील  शेतकर्‍यांनी ऑनलाइन भरलेल्या कर्जमाफीच्या अर्जांंची २७ स प्टेंबरपासून पडताळणी केली जाणार आहे. जिल्ह्यातील  गावागावांत होणार्‍या चावडी वाचनात कर्जमाफीचे अर्ज  भरलेल्या शेतकर्‍यांच्या याद्यांचे वाचन करण्यात येणार आहे

ठळक मुद्देगावागावांत चावडी वाचनात होणार शेतकरी याद्यांचे वाचन

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कर्जमाफी योजनेंतर्गत १५ सप्टेंबरपर्यंत जिल्हय़ातील  शेतकर्‍यांनी ऑनलाइन भरलेल्या कर्जमाफीच्या अर्जांंची २७ स प्टेंबरपासून पडताळणी केली जाणार आहे. जिल्ह्यातील  गावागावांत होणार्‍या चावडी वाचनात कर्जमाफीचे अर्ज  भरलेल्या शेतकर्‍यांच्या याद्यांचे वाचन करण्यात येणार आहे.  सन २00९ ते ३0 जून २0१६ पर्यंत राज्यातील थकबाकीदार  शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.  त्यानुसार कर्जमाफी योजनेंतर्गत थकबाकीदार शेतकर्‍यांना दीड  लाख रुपयांपर्यंंत कर्जमाफी देण्यात येणार असून, कर्जाची  नियमित परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांना २५ हजार रुपयांपर्यंंत  प्रोत्साहनपर अनुदान आणि कर्जाचे पुनर्गठन करण्यात आलेल्या  शेतकर्‍यांना विशेष योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.  त्यानुषंगाने थकबाकीदार शेतकर्‍यांचे कर्जमाफीचे ‘ऑनलाइन’  अर्ज शासनाच्या ‘आपले सरकार’ या संकेतस्थळावर भरण्यात  आले. कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत २२ सप्टेंबर  रोजी रात्री १२ वाजेपर्यंंत होती. त्यानुसार जिल्हय़ातील महा ई- सेवा केंद्र, सामूहिक सेवा केंद्र (सीएससी) व आपले सरकार  सेवा केंद्र इत्यादी सेतू केंद्रांवर गत २४ जुलै ते २२ सप्टेंबरपर्यंंत  थकबाकीदार शेतकर्‍यांचे कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरण्यात  आले. मुदतीपर्यंंत जिल्हय़ात २ लाख ४८ हजार ४२९ शे तकर्‍यांच्या अर्जांंची नोंदणी करण्यात आली असून, १ लाख ३८  हजार ९६२ शेतकर्‍यांचे कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरण्यात  आले. कर्जमाफीसाठी शेतकर्‍यांनी ऑनलाइन भरलेल्या अर्जांंची  गावनिहाय पडताळणी २७ व २८ सप्टेंबर रोजी करण्यात येणार  आहे. त्यामध्ये गावागावांत ग्रामपंचायतींमध्ये कर्जमाफीसाठी  अर्ज भरलेल्या शेतकर्‍यांच्या याद्यांचे वाचन करण्यात करण्यात  येणार आहे.

 तलाठी -ग्रामसेवकांच्या नेमणुका; आज प्रशिक्षणचावडी वाचनात कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज केलेल्या  थकबाकीदार शेतकर्‍यांच्या याद्यांचे वाचन करण्याकरिता   जिल्हय़ात गावनिहाय तलाठी व ग्रामसेवकांच्या नेमणुका  करण्यात आल्या आहेत. कर्जमाफीसाठी अर्ज भरलेल्या शे तकर्‍यांच्या याद्यांसंदर्भात शेतकर्‍यांकडून दाखल होणारे आक्षे पही चावडी वाचनात निकाली काढण्यात येणार  आहेत.  त्यासाठी तलाठी-ग्रामसेवकांचे तालुकानिहाय प्रशिक्षण २६ स प्टेंबर रोजी घेण्याच्या सूचना तहसीलदारांना देण्यात आल्या  आहेत, अशी माहिती प्रभारी अपर जिल्हाधिकारी राजेश खवले  यांनी दिली.

अर्जांंची अशी होणार पडताळणी !गावनिहाय चावडी वाचनात कर्जमाफीसाठी पात्र व अपात्र  ठरणारे शेतकरी, कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज भरलेले शे तकरी, ऑनलाइन अर्ज भरलेल्या शेतकर्‍यांपैकी पुराव्याकरिता  अर्ज प्रलंबित असणारे शेतकरी इत्यादी प्रकारची माहिती चावडी  वाचनात अर्जांंच्या पडताळणीत देण्यात येणार आहे. त्यामध्ये  कर्जमाफीसाठी अपात्र दर्शविण्यात आलेले शेतकरी  कर्जमाफीसाठी पात्र असल्याचा पुरावा सादर करू शकतील.