शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाइन बदली प्रक्रियेत सूट मिळवणाऱ्या २८८ शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 12:32 IST

अकोला : विविध आजाराच्या प्रमाणपत्राच्या आधारे आॅनलाइन बदली प्रक्रियेत सूट मिळवणाऱ्या २८८ पेक्षाही अधिक शिक्षकांच्या वैद्यकीय प्रमाणपत्रांची पडताळणी, तर ११९ शिक्षकांनी दिलेल्या अंतराची तपासणी केली जात आहे.

ठळक मुद्दे बदल्या होणाºया पात्र शिक्षकांची यादी पंचायत समिती स्तरावर गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे असणे आवश्यक होते. पात्र असतानाही शेकडो शिक्षकांनी आॅनलाइन माहितीच भरली नाही. त्यामुळे त्यांना बदली प्रक्रियेतून सूट मिळाली.बदली प्रक्रियेतून सूट मिळालेल्या व आॅनलाइन माहिती सादर न करणाºया शिक्षकांची यादी गटशिक्षणाधिकाºयांकडून मागवण्यात आली.

अकोला : विविध आजाराच्या प्रमाणपत्राच्या आधारे आॅनलाइन बदली प्रक्रियेत सूट मिळवणाऱ्या २८८ पेक्षाही अधिक शिक्षकांच्या वैद्यकीय प्रमाणपत्रांची पडताळणी, तर ११९ शिक्षकांनी दिलेल्या अंतराची तपासणी केली जात आहे. जिल्हा परिषदेच्या दोन वैद्यकीय अधिकाºयांच्या पथकासह शिक्षण विभाग दोन दिवसात अहवाल तयार करून विभागीय आयुक्तांना सादर करणार आहे. त्याबाबतचा आदेश आयुक्त पीयूषसिंह यांनी शुक्रवारीच प्रभारी शिक्षणाधिकारी देवेंद्र अवचार यांना दिला होता.शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या आॅनलाइन करण्यात आल्या. त्यातील कालावधीनुसार अवघड क्षेत्र, सोप्या क्षेत्रातून बदल्या होणाºया पात्र शिक्षकांची यादी पंचायत समिती स्तरावर गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे असणे आवश्यक होते. पात्र असतानाही शेकडो शिक्षकांनी आॅनलाइन माहितीच भरली नाही. त्यामुळे त्यांना बदली प्रक्रियेतून सूट मिळाली, तर इतरांवर अन्याय झाला. त्यामुळे बदली प्रक्रियेतून सूट मिळालेल्या व आॅनलाइन माहिती सादर न करणाºया शिक्षकांची यादी गटशिक्षणाधिकाºयांकडून मागवण्यात आली. तसेच संवर्ग १, २ मध्ये माहिती भरून सोयीची ठिकाणे मिळवण्यासाठी खोटे कागदपत्र, अंतराची माहिती देण्यात आली. या सगळ््या प्रकारांची चौकशी करण्याचा आदेश विभागीय आयुक्त पीयूषसिंह यांनी जिल्हा परिषद प्रशासनाला दिला. त्यानुसार प्रभारी शिक्षणाधिकारी अवचार यांनी शनिवारीच तसे पत्र गटशिक्षणाधिकाºयांना देत शिक्षकांना सोमवारी उपस्थित राहण्याचे बजावले.   एक व दोन संवर्गात ४०७ शिक्षकबदली प्रक्रियेत संवर्ग १ मध्ये समावेश करून लाभ मिळण्यासाठी जिल्ह्यात २८८ शिक्षकांनी अर्ज भरल्याची माहिती आहे. त्याचा लाभ त्यांना मिळाला. तर संवर्ग २ मध्ये ११९ शिक्षकांनी अर्ज भरले. त्यानुसार त्यांची बदली झाली. त्या सर्व शिक्षकांच्या वैद्यकीय प्रमाणपत्रांची पडताळणी केली जात आहे. तसेच संवर्ग-२ अंतर्गत ३० किमीपेक्षा जास्त अंतर नसलेल्या शिक्षकांच्या अंतराची तपासणी केली जात आहे.बदल्यांतील घोळ चौकशीत येणार पुढेसेवाज्येष्ठ शिक्षकांनी मागितलेली गावे कनिष्ठ शिक्षकांना देण्यात आली. संवर्ग-४, संवर्ग- २ मधून अर्ज केलेल्या शिक्षिकांना ३० किमीपेक्षा जास्त अंतराची गावे मागणी केल्यानुसार कशी देण्यात आली, त्यांना ३० किमीच्या आत देणे आवश्यक होते. नियुक्ती दिनांक सारखाच असतानाही काहींना ‘खो’ देण्यात आला. एकाच शिक्षकाला दोन ठिकाणी पदस्थापना देण्याचेही पुढे येत आहे. हा घोळ आता चौकशी अहवालात पुढे येणार आहे.दोन वैद्यकीय अधिकाºयांकडे तपासणीसंवर्ग १ चा लाभ मिळण्यासाठी शिक्षकांनी सादर केलेल्या वैद्यकीय प्रमाणपत्रांची तपासणी केली जात आहे. त्यासाठी प्रभारी अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉ. विजय जाधव, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. भास्कर सगणे यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. संवर्ग दोनमधील अंतराची पडताळणीही केली जात आहे.माहिती न भरणारे गुलदस्त्यातबदली प्रक्रियेत माहिती न भरता त्यापासून अलिप्त राहून लाभ मिळवणारे किती शिक्षक आहेत, याची माहिती अद्याप पुढे आली नाही.

 

टॅग्स :AkolaअकोलाTeacherशिक्षक